शिल्पा शेट्टी पडता पडता बचावली.. पापरझीवर झाली नाराज..

0

दिल वालो का दिल लुटने आईं हुं म्हणत गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या दिलखुलास अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.. बॉलिवूडमध्ये सतत काही ना काही कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येणारी शिल्पा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिचा एक पाय तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फ्रॅक्चर झाला होता. या दुर्घटनेनंतर सहा आठवड्यांसाठी डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी पडता पडता वाचली आहे. यासंदर्भातील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिल्पा शेट्टी ही मुंबईत खरेदीसाठी गेली होती. यावेळी एका दुकानात जात असताना तिकडे काही पापाराझी तिला फोटोसाठी विनंती करु लागले. यावेळी शिल्पा शेट्टीने दुकानाचा दरवाजा उघडला. मात्र हा दरवाजा उघडत असताना ती पापाराझींना फोटोसाठी पोज देत होती. यावेळी तिचा तोल गेला. पण ती पडता पडता वाचली. ही सर्व घटना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. आणि काही वेळात व्हायरल देखील झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी ही पापाराझींवर भडकल्याचेही पाहायला मिळत आहे. “मी म्हणून सांगत असते… “असे शिल्पा शेट्टी ही रागात त्या सर्व फोटोग्राफर्सवर भडकते. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान शिल्पा शेट्टी ही उत्तम नृत्यांगणा म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शो चे परीक्षण तिने केले आहे. तसेच तिला फिटनेस फ्रीक अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. ती अनेकदा योगा, जीम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दरम्यान, शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भोजपुरी चित्रपटातील डायलॉग्सवर तिचे एक्सप्रेशन शेयर केले आहेत. यावेळी भोजपुरी डायलॉग्सवर शिल्पाचे एक्सप्रेशन पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रा मवर शेअर केलेल्या पोस्टपासून लोक तिच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक करत आहेत. ही रील इंस्टाग्रामवर शेअर करताना शिल्पाने संडे रील असे कॅपशन लिहिले आहे. शिल्पाच्या या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तिच्या या व्हिडीओ वर लोक लोट पोट झालेत. तशा कॉमेंट्स करत चाहत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.ती लवकरच तिच्या निकम्मा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.