जवळपास 500 दिवसांनंतर शिखर धवनला आला टीम इंडियाकडून कॉल, तो आता या टीम कडून जानेवारीमध्ये खेळणार मालिका… Shikhar Dhawan

Shikhar Dhawan भारतीय क्रिकेट संघ सध्या आफ्रिकन संघासोबत 3 T20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहित शर्मा सांभाळत असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली कसोटी खेळण्यास सुरुवात केली आहे. पण या सगळ्यात सामर्थ्यशाली सलामीवीर शिखर धवनला संघात येण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून तो नव्या वर्षात संघाचा भाग होणार आहे.

 

शिखर धवन संघात परतणार!

वास्तविक, शिखर धवनने 2022 साली बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता त्याला संघात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. जिथे तो जवळपास 500 दिवसांनी संघात परतणार आहे. गब्बरला अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी बोलावण्यात आले आहे.

अफगाणिस्तान मालिकेसाठी कॉल आला!
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआयने शिखर धवनला आगामी अफगाणिस्तान मालिकेसाठी आमंत्रित केले आहे आणि त्याला संघाचा भाग बनवायचे आहे. गब्बरला निमंत्रित करण्यामागे आगामी टी-२० विश्वचषक असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही सांगता येत नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून व्यवस्थापनाने त्याला सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवले असून तो अफगाणिस्तान मालिकेतून संघाचा भाग बनणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिका
टीम इंडियाला 11 जानेवारीपासून अफगाणिस्तान संघासोबत 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, ज्यासाठी अफगाणिस्तान संघाला भारतीय दौऱ्यावर यायचे आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी ही मालिका भारतीय संघाची शेवटची मालिका असणार आहे, त्यामुळे धवनला या मालिकेत संधी मिळू शकते. मात्र, आता हे संघ जाहीर झाल्यानंतरच कळेल.

Leave a Comment

Close Visit uttamsheti