‘रात्रीस खेळ चाले..’ फेम शेवंता अडकली लग्नबंधनात..सप्तपदीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
सध्या टिव्ही इंडस्ट्री मध्ये लग्नाचा सिझन चालू आहे असं म्हणण्यात काही गैर नाही. छोटया पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी-अक्षया देवधर नंतर लगेचच अभिनेता सुमित पुसावळे-मोनिका महाजन, हरीश दुधाडे-समृद्धी निकम यांचे लग्न सोहळे पहायला मिळाले. त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहेत. त्यातच आता झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले मालिका फेम एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या..
या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळसकर हिचा लग्नसोहळा पार पडला.
अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने दोन दिवसांपूर्वी दिग्दर्शक विशाल देवरुखकरबरोबर लग्नगाठ बांधली. कृतिकाने त्यांच्या लग्नाचे काही निवडक क्षण असलेले फोटो तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. “आता ही व्यक्ति संपूर्ण मालकी हक्कानी माझी”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. यात ते दोघेही पारंपारिक वेशात पाहायला मिळाले.
View this post on Instagram
तर दुसरीकडे विशाल देवरुखकरने त्यांच्या लग्नातील विधींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तो तिच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहेत. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत आहेत. त्याबरोबरच आता कृतिकाने त्यांच्या लग्नातील सप्तपदी घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने तिच्या लग्नातील कपड्यांबद्दल सांगितले आहे.
सप्तपदी….आमच्या लग्नात मी आणि विशाल ने जे काही सुंदर कपड़े घातलेत ते दीपा ने आमच्या मैत्रीनी ने बनवले होते .तीला काही सांगायची गरज च आम्हाला लागली नाही .तिने आमचा स्पेशल डे अजून स्पेशल बनवला.आमचे सगळे लग्नाचे कपड़े स्वतःच्या हाताने आणि प्रेमाने तयार करण्यासाठी खुप खुप खुप थँक यू… तुम्ही तिच्या बुटीक ला जाऊन खुप छान कपडे बघू शकता आणि तुमच्या स्पेशल डे ला खुप सुंदर दिसू शकता”, असे तिने म्हटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान दिग्दर्शक विशाल देवरुखकर मराठी सिनेसृष्टीत काम करता करता त्याची ओळख अभिनेत्री कृतिका तुळसकर हिच्याशी झाली. आधी ओळख मग मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत. त्यांच्या लग्नप्रसंगी कुटुंबीय आणि काही नातेवाईक हजर होते. त्यांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नाची वचने घेतली आहेत.या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले.
दरम्यान, त्यांच्या या फोटोज् आणि व्हिडिओजना चाहत्यांनी डोक्यावर घेत लाइक्स आणि कॉमेंट्स चा पाऊस पाडला आहे. शिवाय त्यांच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.