शहनाजने गायले “तुझमें रब दिखता हैं “, गाण्याने चाहते झाले भावूक.. म्हणाले सिद्धार्थची आठवण येतेय ना?
बिग बॉस या वादग्रस्त शोने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. बिग बॉस सिझन १३ मधील अशीच एक कलाकार जिला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली असून तिनं प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. ती म्हणजे शहनाज गील तिच्या क्यूट अंदाजाने तिने अनेकांना आपलेसे केले. दरम्यान, तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेयर केलेला एक व्हिडियो तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडियो?
अभिनेत्री शहनाज गिलने रविवारी सोशल मीडियावर तिने आपल्या सुंदर अशा आवाजात बॉलीवूड मधील एव्हरग्रीन ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमातील ‘तुझ में रब दिखता है गाणे’ गातानाचा हा व्हिडिओ शेयर केला आहे. यावेळी व्हिडिओमध्ये, शहनाजने साधेपणाचे कंपन दिले आहे कारण तिने साधा गुलाबी कुर्ता परिधान केला आहे आणि तिचा लाईट मेकअप केला आहे.सोबतच तिने कॅपशन दिले की,, “कैस लगा ये गाना?”
View this post on Instagram
तिच्या या व्हिडियोला चाहत्यांची लोकप्रियता मिळते आहे. यावर चाहते लाइक्सचा पाऊस पाडत अनेक कॉमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने’तुझा आवाज खूप चांगला आहे,” तर दुसऱ्या युजरने, “तुला सिद्धार्थची आठवण येतेय ना, तू हे गाणं सुद्धार्थसाठी गायलंय ना?”,,’मस्त, मॅजिकल आवाज आहे’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत.त्याचवेळी, शहनाज गिल ज्या साधेपणाने हे गाणे गाते आहे, त्यावरून असा अंदाज लावता येतो की, अभिनेत्री आजही तिचा प्रेम सिद्धार्थ मल्होत्राला मिस करते. शहनाज गिलच्या या लेटेस्ट व्हिडिओला खूपच आवडीने पाहिले जात आहे
गेल्या काही काळापासून ती नवनवीन गाण्याचे व्हिडीओ शेअर करत आहे. तिच्या गायनाला लोक पसंत करत आहेत. शहनाज लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. ती सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय ती जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि नोरा फतेहीसोबत साजिद खानच्या ‘१०० टक्के’ चित्रपटात दिसणार आहे.यापूर्वी शहनाज दिलजीत दोसांझसोबत पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’मध्ये दिसली होती.
बिग बॉस १३ मध्ये काम केल्यानंतर शहनाजला प्रसिद्धी मिळाली. तिने २०१५ म्युझिक व्हिडिओ, ‘शिव दी किताब’ द्वारे तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. २०१७मध्ये, तिने पंजाबी चित्रपट ‘सात श्री अकाल इंग्लंड’ मध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आणि नंतर २०१९मध्ये ‘काला शाह काला’ आणि ‘डाका’ मध्ये काम केले.