शेफाली चा देसी लुक झाला तुफान व्हायरल.. पण स्लिव्हलेस ब्लाऊजने केले चाहत्यांना नाराज..

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अवखळ आणि निरागस पात्र म्हणजे नेहाची मैत्रिण म्हणजे शैफाली. मालिकेत जिवंत पणा टिकवण्याचे काम शेफाली आपल्या निरागस अभिनयाने करते. शैफाली म्हणजेच अभिनेत्रा काजल काते ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेच शिवाय ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती नेहमी तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांसाठी शेयर करत असते.

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत जे तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती चक्क बाजारात भाजी विकताना दिसून येत आहे. पण काहीना वाटत आहे की तिने मालिकेतून निरोप घेऊन दुसरे काम करणार आहे. पण तस काही नसून काजलनं तिच्या नव्या कामाचं फोटोशूट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

काजलने या फोटोमध्ये काळी पारंपारिक साडी नेसली आणि गडद लाल बांगड्या, हलक्या वजनाचा हार, पारंपारिक नथ आणि सिंदूरने तिचा लूक परिपूर्ण केला आहे. सोबतच तिने तिचे केस हलके विस्कटलेले ठेवत सैल पोनीटेलमध्ये बांधून ठेवले आहेत. तिच्या मेकअपसाठी तिने लिपस्टिकची हलकी शेड लावली आणि मिनिमलिस्ट मेकअप लुक ठेवला आहे जो अगदीच उठून दिसतो आहे.तिचा मेकअप प्रांजली शेलारने केला आहे, तर अभिनेत्री मानसी टाकळीकरने तिचा लूक स्टाईल केला आहे. शेयर केलेल्या फोटोज् मध्ये काजल फुलकोबीच्या टोपलीसह दिसून येत आहे. तिच्या पुढच्या शॉटमध्ये, ती गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये खुलून पोझ देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

पण या सगळ्यात तिनं साडीवर घातलेलं सिव्हलेस ब्लाऊज नेटकऱ्यांना मात्र चांगलंच खटकलं आहे.’प्रॉपर ड्रेस हवा होता छान दिसली असतीस तरी हे सिव्हलेस नकली वाटते’, अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे.तर अनेकांनी काजलच्या या नव्या लुकचं कौतुक केलं आहे.काजलचा हा नवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्याच वेशात काजलने इंस्टाग्रामवर एक रील देखील पोस्ट केला आहे. ते शेअर करताना,माझ्या आवडत्या शॉट्सपैकी एक’, असे कॅप्शन दिले आहे.

काजलच्या या फोटोज् नी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काजल काटे ही सोशल मीडियावर नेहमीच तिचे सुंदर फोटो पोस्ट करत असते. ज्यामध्ये तिची ग्लॅमरस तसेच तिची पारंपारिक बाजू देखील दिसून येते. काही काळापूर्वी या अभिनेत्रीला मराठी टीव्ही शोमधील तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप