मुरांबा मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या अक्षय अर्थात शशांकने घेतला मालिकेतून या खास कारणासाठी ब्रेक, कारण..
सध्या टिव्ही जगतातील मालिका आणि त्यामधील कलाकार नेहमीच सोशल मीडियावर झळकत असतात. त्यांच्याबद्दलच्या गोष्टी अगदी वाऱ्यासारख्या पसरतात. त्यातही कित्येक कलाकार अनेक मालिकेत, चित्रपट तसेच इतर प्रोजेक्ट्स वर काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. साहजिक यात त्यांची बरीच दमछाक होते. त्यामुळे ब्रेक घेणं महत्वाचं ठरत. म्हणूनच बऱ्याचदा कलाकारानी मालिकेतून ब्रेक घेतल्याच्या बातम्या समोर येत असतात.
दरम्यान नुकतीच बातमी समोर येत आहे की, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत अक्षयची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. होय
,तो सध्या अमेरिकेत आहे.सोशल मीडियावर त्याने अमेरिकेतील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. आमने सामने या नाटकाच्या प्रयोगसाठी शशांक अमेरिकेत गेला आहे. या नाटकात त्याच्यासोबत माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलने काम केलं.
मुरांबा या मालिकेमध्ये शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर आणि निशानी बोरूले मुख्य भूमिकेत आहेत.शिवानी मुंढेकर रमा तर निशानी रेवाची भूमिका साकारतेय. या मालिकेच्या मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. असे शशांकने स्पष्ट केलं.
मालिकेत त्याने साकारलेला अक्षय मुकादम असं व्यक्तिरेखेचं नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात. शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला त्याला आवडतात. मालिकेत देखिल त्याचं स्वयंपाक घराशी जवळचं नातं असणार आहे. असे त्याने सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान, एका मुलाखतीत शशांकला त्याच्या भूमिकेविषयी विचारण्यात आल्यावर म्हणाला की, मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅण्टिक भूमिकेची वाट पहात होतो. भुमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे.
मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. स्टार प्रवाहवसोबत जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय. स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप मजा येतेय. आणि तो म्हणाला की, जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे.