राहुल, अक्षर पटेल नंतर शार्दुल ठाकूरने हि बांधली लग्न गाठ, नातेवाईकांनी खांद्यावर घेऊन केला भन्नाट डान्स..

0

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, ज्याला लॉर्ड म्हणून ओळखले जाते, तो भारतीय संघाचा प्रमुख भाग आहे. जेव्हा टीम इंडियाला मैदानात विकेट हवी असते तेव्हा ठाकूर ते काम करतात. फलंदाजीतही त्याने प्रसंगी संघाची इज्जत वाचवली आहे.

२७ फेब्रुवारीला शार्दुल ठाकूर विवाहबंधनात अडकणार आहे. शार्दुल त्याची मैत्रिण मितालीसोबत सात फेरे घेणार आहे. दरम्यान, लग्नापूर्वी त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ठाकूर आनंदाने नाचताना दिसत आहेत. ठाकूरचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. 27 फेब्रुवारीला शार्दुल त्याची मंगेतर मिताली पारुलकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या एक दिवस आधी मेंदीचे फंक्शन होते. ज्यामध्ये शार्दुलने जबरदस्त डान्स केला.

या व्हिडिओमध्ये शार्दुलसोबत त्याचे कुटुंबीयही दिसत आहेत. पिवळ्या कुर्त्यात शार्दुल बॉलिवूडच्या हिरोसारखा दिसत आहे. शार्दुल ठाकूरच्या डान्सचा हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शार्दुल आणि मिताली यांची 2021 मध्ये एंगेजमेंट झाली. आता वर्षभरानंतर दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नानंतर लवकरच शार्दुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात सामील व्हायचे आहे. यानंतर, तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठी 2 महिने आयपीएल 2023 मध्ये व्यस्त असेल. आणि त्यानंतर या वर्षाच्या अखेरीस भारताला ५० षटकांचा विश्वचषकही खेळायचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप