“सुख म्हणजे नक्की काय असत” फेम शालिनीला झाली मारहाण…सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ…

0

मित्रहो मराठी रंगभूमीवर “सुख म्हणजे नक्की काय असत” मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेचे कथानक आणि यातील कलाकार विशेष लक्षवेधी ठरले आहेत. सुरुवातीपासूनच ही मालिका पडद्यावर रंगात येत राहिली आहे. प्रत्येक वेळी याच्या भागाबद्दल रसिकांना कुतूहल वाटत असते, यातील सकारात्मक भूमिका तर लक्ष वेधून घेतातच सोबतच नकारात्मक भूमिका देखील आणखीनच गाजलेल्या आहेत. यातील प्रत्येक वेळी घडत आलेलं काम बिघडवायला तयार असणारी शालिनी भलतीच लोकप्रिय झाली आहे. सध्या तिच्या बाबतीत एक वाईट घटना समोर येत आहे.

शालिनीला काही महिलांनी मोठी मारहाण केल्याची मोठी बातमी समोर येत आहे. तिच्या बाबतीत अशी माहिती ऐकताना नेटकरी देखील थक्क झाले आहेत. तर मित्रहो यामध्ये नेमकं काय सत्य आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊ. मित्रहो रस्त्यावरून जाताना आपण अनेकदा मोठी भांडणे पाहत असतो, काहीजण मारहाण करत असतात. त्यांचा काहीतरी वयक्तिक वाद असेल असा विचार करून आपण तिथुन निघून येतो. पण तेच जर एखादी सेलिब्रेटी काहीही कारण नसताना मार खात असेल तर लोक आश्चर्य व्यक्त करतात.

“सुख म्हणजे नक्की काय असत” मालिका प्रत्येक वेळी चर्चेत येत असते, मालिकेतील अनेक भूमिकांसह शालिनी वहिनीची भूमिका देखील विशेष लोकप्रिय आहे. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे. माधवीची भूमिका जरी नकारात्मक असली तरीही या भूमिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. या भूमिकेतून माधवी विशेष गाजली आहे, हा ब्रेक तिच्या करिअर साठी खूपच मौल्यवान ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील तिच्या चर्चा रंगल्याशिवाय राहत नाही. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक लोकांनी तिला फॉलो सुद्धा केले आहे.

माधवीने लग्न केले आहे, तिच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असे आहे. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. या फॅमिलीचे खूपसे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. निरनिराळ्या कार्यक्रमातून या कुटुंबाचे दर्शन होत असते, त्यामुळे नेटकरी माधवी बद्दल सर्वकाही जाणून आहेत. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. “सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील एक खास किस्सा तिने चाहत्यांशी शेअर केला आहे. या मालिकेत तिचे पात्र नकारात्मक आहे,त्यामुळे खूपशा ठिकाणी गेल्यावर तिला टीका देखील मिळाली आहे. पण मिळालेल्या टिकेवरून ती म्हणते की हे माझे यश आहे.

काही दिवसांपूर्वीचा अनुभव शेअर करत ती म्हणते “काही दिवसांपूर्वी मी एका ठिकाणी गेले होते, असच मी एका जागेवर बसले होते. त्यावेळी पाठीमागून दोन महिला आल्या आणि मला पाठीत त्यांनी जोरदार पणे मारले आणि सांगितले की तू गौरीला फार त्रास देऊ नको, अशी करत जाऊ नको. तू जरा नीट रहा.”. असे म्हणत त्या महिलांनी माधवीला मारले. ही आठवण तिने नेटकऱ्यांशी शेअर केली आहे. पण हे तिचे यश असून, तिची भूमिका चांगलीच रंगली आहे. तिला नेहमी असेच यश मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप