“शकालका बुम-बुम” फेम संजू आता झालाय मोठा, दिसतो इतका हँडसम की अनेक मुली होतात फिदा..

मित्रहो बालकलाकार अनेक चित्रपटात झळकत असतात, त्यांच्या गुणांची पारख करता करता मोठ मोठे प्रसिद्ध कलाकार सुद्धा थक्क होतात. या बालकलाकारांचे सर्वत्र कौतुक होत असते. पण जेव्हा हे चिमुकले मोठे होतात तेव्हा अगदी ओळखिस सुद्धा येत नाहीत. त्यांचे तरुण रूप पाहताना चाहते देखील चकित होऊन जातात, सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्यांचे फोटो पाहिल्यावर सहज ओळख देखील लागत नाही. मित्रहो असाच एक बालकलाकार ज्याने या मालिका सृष्टीत आपल्या अभिनयाची चांगलीच जादू दाखवली आहे.

 

सर्व मालिकांमध्ये “शकालका बुम-बुम” प्रचंड लोकप्रिय मालिका आहे, ही मालिका पूर्णपणे एका मॅजिक पेन्सिलवर आधारित आहे. मालिकेचे कथानक अनेक लहान मुलांना आकर्षित करणारे होते, यामध्ये संजू ही भूमिका मुख्य होती. मालिकेतील मॅजिक पेन्सिलच्या मदतीने अनेक लोकांची मदत केली आहे. त्यांचे प्राण वाचवले आहेत, या पेन्सिलच्या मदतीने त्याने या कथानकात अनेक कारनामे केलेले आहेत. ही जादू पाहताना आपोआप लोक मालिकेकडे आकर्षित होतात. यातील सर्वच भूमिका खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

यामधील संजू अतिशय लोकप्रिय झाला आहे, या संजूने अनेक मनावर अधिराज्य गाजवले आहे. यातील संजूची भूमिका किंशुक वैद्य याने साकारली आहे. किंशुक याने या मालिकेत अति सुंदर काम केले आहे, आता हा किंशुक मोठा झाला असून तारुण्याच्या पायरीवर त्याचे आगमन झाले आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, या फोटोंना अनेकांची विशेष पसंती मिळत आहे. या फोटोनी सोशल मीडियावर अगदी जादू पसरवली आहे. अनेक तरुण त्याच्या लुकला पाहून थक्क झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kinshuk Vaidya (@kinshukvaidya54)

तसेच तरुणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर फिदा आहेत. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबर २००० रोजी “शकालका बुम-बुम” शो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यामधील संजू आपल्या जादूच्या पेन्सिलने अनेक कारनामे करायचा. जादूच्या पेन्सिलने तो जे चित्र काढायचा ते प्रत्यक्षात समोर असायचे. संजू खूपच गोड दिसायचा, त्याच्या हसण्याने अनेकजण त्याच्या बालपणाच्या प्रेमात पडायचे. अनेकांची त्याने मने जिंकली होती. या मालिकेतून तो घराघरात पोहचला होता. इंडस्ट्री मधील तो एक प्रसिध्द आणि लोकप्रिय चेहरा बनला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kinshuk Vaidya (@kinshukvaidya54)

किंशुक आता खूप मोठा झाला आहे, त्याचे खूपसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. “शकालका बुम-बुम” मालिकेनंतर त्याने खुप मोठा ब्रेक घेतला आहे. कळविश्वापासून तो खूप वर्षे दूर होता. त्याने आता “ये रिश्ता पार्टनरशिप का” या चित्रपटातून आपला कमबॅक केला आहे. त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहून लोक खूप खुश आहेत. तर मित्रहो हा लहान संजू आणि मोठा संजू तुम्हाला आवडतो का ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti