तारक मेहता शो सोडल्यावर शैलेश लोढा म्हणाले..” मी भावूक होतो..”

0

छोटया पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि अलीकडेच सर्वात चर्चेत असणारा शो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. ही मालिका चर्चेत येण्याचे कारण म्हणजे शो मधून सर्वांच्या लाडक्या तारक मेहता अर्थात शैलेश लोढा यांनी घेतलेली एक्झिट. दरम्यान याबाबत शैलेश लोढा यांनी केलेलं आणखी एक वक्तव्य चर्चेत आले आहे.

शैलेश लोढाने सिद्धार्थ कननच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी मालिका सोडण्याबद्दल असे सांगितले की ‘गेली १४ वर्ष मी मालिकेत होतो. या मालिकेबद्दल मी खूप भावुक आहे. मी रोज सेटवर जायचो, काम करायचो. मी तसा कोणाची वाट बघणारा नाही मात्र या मालिकेसाठी मी वाट बघितली. माझा नाईलाज होता, मी एक दिवस सांगणार आहे मी मालिका का सोडली आहे ते, योग्य वेळेची मी वाट बघत आहे’. शैलेश आणि या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यामध्ये वाद झाल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला असेही बरेचसे लोक म्हणत होते.

दरम्यान, असित मोदी यावर म्हणाले,
काही तरी कारण आहेत. असं नाही की मी कधी याबद्दल बोलणार नाही. बोलणार तर नक्कीच आहे फक्त योग्य वेळ आली की, मी ही मालिका का सोडली हे नक्कीच सांगेल, असे शैलेश लोढा यांच्याकडून सांगण्यात आले. शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यानंतर त्यांची या मालिकेचे दिग्दर्शक असित मोदी यांच्यासोबत वाद झाल्याचे देखील बोलले गेले. तर असित मोदी यांच्या मालिकेतील टीममधील लोकांकडून देखील शैलेश लोढा यांना या मालिकेत काम करण्यासाठी पुन्हा येण्याची विनंती देखील करण्यात आल्याचे बोलले गेले.

दरम्यान, या मालिकेचे दिग्दर्शक यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश लोढा यांना या मालिकेत पुन्हा आणण्याचे अनेक प्रयत्न केले गेल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांची वाट देखील पाहिली गेल्याचे बोलले जाते. परंतु शैलेश लोढा या मालिकेत न परतल्याने त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ यांची तारक मेहता म्हणून निवड करण्यात आली.

मालिकेतून आत्तापर्यंत दिशा वकानी, भव्य गांधी, शैलेश लोढा, नेहा मेहता, निधी भानुशाली, गुरुचरण सिंह अशा अनेक कलाकारांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली आहे. मालिकेतील लोकप्रिय पात्र दयाबेन उर्फ दिशा वकानीदेखील मालिकेत केव्हा परतेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून आहे. आणि यावर वरचेवर नेटकऱ्यांची चर्चा रंगत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप