‘दे धक्का 2’ सिनेमात गाजला शहाजी बापूंचा काय झाडी काय डोंगार डायलॉग… काय आहे याची पार्श्भूमी नक्की वाचा
मराठी सिनेमा सृष्टीत अतिशय लोकप्रिय असलेला सिनेमा म्हणजे से धक्का..चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं. चित्रपटाची कथा चाहत्यांच्या मनाला अर्थात स्पर्श करणारी होती आणि प्रेक्षकांनी सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं.आता तब्बल १३ वर्षांनंतर या सिनेमाचा दमदार सिक्वल भेटीला येतोय.या निमित्तानं चित्रपटातील स्टार कास्ट ने शूटिंग दरम्यानचे आपले अनुभव शेयर केले.
दे धक्का 2 चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तत्पूर्वी त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात गुवाहाटीची झलक पाहायला मिळाली होती. दरम्यानच्या काळात बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या शहाजी बापूंचा व्हायरल झालेला एक डायलॉग चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आला. जो चाहत्यांना खूपच आवडला.
काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील… ओक्केमधीय असा आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला. या डायलॉगवर असंख्य मिम्स तर, गाणीही बनवण्यात आली जी धुमधडाक्यात वाजलीच नाहीतर गाजली देखील.
काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील हे पत्नीसह झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमात दिसून आले. त्यावेळीही, त्यांनी तो डायलॉग म्हटला होता. आता, दे धक्का 2 चित्रपटातही शिवाजी साटम यांनी ग्रामीण भागातील आजोबाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात शिवाजी साटम यांनी काय झाडी.. काय हाटील… असा डायलॉग आपल्या अंदाजात म्हटला आहे.लंडनमध्ये गेल्यानंतर तेथील झाडी आणि हाटील पाहून त्यांनी हा डायलॉग उच्चारला.त्यामुळे, या चित्रपटात हा डायलॉग कसाकाय घेतला, यासंदर्भात शिवाजी साटम यांना प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर, त्यांनी उत्तर दिलं की,
चित्रपटात हा डायलॉग अचानक अॅड झालेला नाही. आम्ही शूट करत असलेलं लंडनमधील लोकेशनच तसं होतं. त्यामुळे स्क्रीप्टच्या गरजेनुसार तो अगोदरच घेतलेला डायलॉग आहे. महेश मांजरेकर गंमतीने म्हणाले, शहाजाबापूंनीच आमचं पाहून तो डायलॉग घेतलाय, असं उत्तर शिवाजी साटम आणि मकरंद अनासपुरे यांनीही दिलं.तसेच, तुम्ही नीट बघा चित्रपटात माझं कॅरेक्टरही तसंच ग्रामीण भागातलं आहे. त्यामुळे आपसूकच तो संवाद तोंडातून आणि मनातून बाहेर येतो. बाब्बो… वैगेरे आपण म्हणतो. तसाच तो काय झाडी… आलेला डायलॉग आहे.
दरम्यान, हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आणि अनेक रसिक प्रेक्षकांनी या सिनेमाला भरपूर प्रेम दिले आहे. हा सिनेमा मनोरंजक तर आहे आणि तितकीच धमाल पहायला मिळते आहे. काही गोष्टींचा फार विचार नाही केला तर मज्जा अधिक येईल.