ओव्हर ॲक्टिंग नडली, ख्रिसमस पार्टीला गेलेली अजय देवगणची मुलगी नायसाचा हा व्हिडीओ पाहून लोक म्हणतायत, ‘हिनं नक्कीच पार्टीत..’

0

बॉलिवूडमधील स्टार किड्स नेहमी लाईम लाईट मध्ये येत असतात आणि नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनत असतात. तसे बरेच स्टार किड्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतात. पण काही असे स्टार किड्स असतात ज्यांना ही लाईम लाईट नको अस्त किंबहुना त्यांना प्रसिद्धी किंवा नेहमी चर्चेत येणे पसंद नसते. अशीच स्टार कीड आहे अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण. पण सध्या ती चर्चेत येताना दिसते आहे. काय आहे तीच चर्चेत येण्याचं कारण जाणून घ्या…

सिनेसृष्टीपासून चार हात लांब असणारी स्टार किड म्हणून न्यासा नेहमीच चर्चेत येत असते. सध्या ती फक्त १९ वर्षांची आहे. तिच्याबद्दल खास अस की तिने परदेशात शिक्षण घेतलं आहे पण सध्या ती मुंबईत सारखी पहायला मिळत आहे. नुकतीच ती तिचे स्टार कीड फ्रेंड्स ऑरी, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपाल सोबत ख्रिसमस पार्टी सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

न्यासा जेव्हा पार्टी करुन बाहेर आली तेव्हा तिला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी पापाराझीमध्ये झुंबड माजली होती. यावेळी सुरुवातीला तर कॅमेरा पाहून ती घाबरली, पण नंतर तिनं असा काय अॅटिट्युड दाखवला की नेटकरी तिचा व्हिडीओ पाहून तिला ती ओव्हर ॲक्टिंग करतेय अस म्हणत ट्रोलींग सुरू केलं आहे.

या व्हिडीओवर लोकांनी अनेक कॉमेंट्सचा भडिमार केला आहे. कोणी म्हणताना दिसत आहेत की तिनं नक्कीच ड्रिंक केलंय आणि ती नशेत आहे. तर कुणी म्हणतंय, एवढी ओव्हर अॅक्टिंग करण्याची गरज आहे का?’ तर अनेक जण तिच्या गोऱ्या रंगावर आणि प्लास्टिक सर्जरीविषयी चर्चा करताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, न्यासा काही काळ आधीपर्यंत खूप वेगळी दिसायची. तिचा रंग आधी सावळा होता. पण गेल्या काही वर्षात नीसाचा रंग एकदम बदलला आहे. ती गोरी दिसत आहे. काही लोक तर हे देखील म्हणताना दिसत आहेत की तिनं सर्जरी केली आहे..

एका मीडिया रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये न्यासाला लोकांनी खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं होतं, जेव्हा ती आपले आजोबा वीरू देवगण यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी सलौन मध्ये गेली होती. त्यानंतर अजय देवगणनं स्पष्टिकरण देत म्हटलं होतं की, त्याची मुलगी न्यासा आजोबांच्या निधनानंतर खूप अपसेट झाली होती म्हणून त्यानेच तिचा मूड ठीक व्हावा म्हणून बाहेर पाठवलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.