सध्या सर्वत्र क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींविषयी चर्चा रंगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरम्यान, उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतनंतर छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव आणि क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर नेतकऱ्या मध्ये नेहमीच चर्चा सुरु असते. मध्यंतरी ऋतुराज गायकवाडनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली. त्या कमेंटनंतर सायली आणि ऋतुराज गायकवाड हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पण आता सायलीनं एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. जी व्हायरल होते आहे.
सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत. ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता सायलीने ऋतुराज आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे
सायली ने गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सायलीला ऋतुराजबरोबरच्या नात्याबद्दल विचारण्यात आले यावेळी तिने केलेल्या भाष्याने सर्वजण चाट पडले आहेत.
ती म्हणाली, जेव्हा ऋतुराज आणि माझ्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला. आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं देखील बोलू शकत नाही. माझं नाव त्याच्याबरोबर जोडलं जातं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती”, असे तिने म्हटले.
त्यापुढे ती म्हणाली, “आमच्या वयाबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. मी २९ वर्षांची आहे आणि तो २५ वर्षांचा आहे. आम्ही सुरुवातीला एकमेकांशी बोलायचो. पण आता आमच्यात काहीही गप्पा होत नाहीत.” सायलीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे ऋतुराज आणि तिच्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.अफवांमुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातही काही समस्या निर्माण होतात, ज्या गॉसिपमिंग करणाऱ्यांना समजत नाहीत. त्याचा आपल्यावर थोडा परिणाम होतो. तो एक चांगला खेळाडू आहे. आणि सुरुवातीला, आम्ही याबद्दल बोललो. पण सध्या काहीच बोलणे होत नाही.
ऋतुराजने काही वर्षांपूर्वी संजीव यांच्या पोस्टवर टिप्पणी केल्यानंतर सर्व अफवा सुरू झाल्या. मात्र, दोघांनीही या नात्याबाबतच्या त्यांच्या भूमिकेबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही आणि मीडिया रिपोर्ट्स हे गृहीत धरत राहिले.