सध्या सर्वत्र चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘हर हर महादेव’.. या आगामी चित्रपटाचे प्रमोशन जोशात सुरू आहे. आणि याचसाठी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सायली संजीवनेदेखील नुकतीच ‘बस बाई बस’ कार्यक्रमाच्या मंचावर चित्रपटाच्या इतर कलाकारांसह हजेरी लावली. यावेळी तिने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सरळ सरळ अफवा आहेत असे सांगून सारवासारव केली. तो ‘काहे दिया परदेस’ मालिकेचा फॅन होता. मलाही आश्चर्य वाटलं होतं, पण माझ्यापेक्षा तो खूपच लहान आहे, असं म्हणत सायलीने पुन्हा एकदा या अफवा असल्याचं स्पष्ट करत वक्तव्य केलं.
दरम्यान, होस्ट सुबोध भावेने तीच्य लव्ह लाईफ बद्दल अनेक प्रश्न केले ज्यावरील तिची उत्तरे ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. मालिकेतील को-स्टारसोबत कधी सूत जुळलं का, असा प्रश्न विचारला असता ‘काहे दिया परदेसमधील सहकलाकार रिषी सक्सेना आणि माझं नाव खूप वेळा जोडलं गेलं होतं. पण तसं काहीच नव्हतं. तुम्हाला तर आता माहितच आहे’ असं सायली म्हणताच ‘बिना आग के धुआ नही होता’ असं बोलून अभिनेता शरद केळकरने चिमटा काढला. त्यावर ‘ऋतुराज गायकवाडच्या बाबतीतही झालं होतं’ असं म्हणत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते सुबोध भावेंनी यात उडी घेतली. ‘तुम्ही हा प्रश्न मला विचारताय?’ असं सायली आश्चर्याने म्हणातच ‘लोकांच्या मनातला प्रश्न आहे’ असं भावे म्हणाले. त्यावर ‘असेल तर मला प्लीज बॅट पाहिजे’ असं शरद केळकर मिश्कीलपणे म्हणाला.
बॅट मी मिळवून देऊ शकते कारण तो माझा खरंच खूप चांगला मित्र आहे. आयपीएल खेळणारे दोन-तीन जण माझे मित्र आहेत. एक आरसीबीमध्ये आहे, ऋतुराज आणि तुषार देशपांडे सीएसकेमध्ये आहेत. हे सगळे काहे दिया परदेसचे फॅन होते. मला आश्चर्य वाटलं की क्रिकेटर कसे काय सिरीअलचे चाहते. म्हणजे त्यांना कधी वेळ मिळतो मालिका बघायला. पण माझ्यापेक्षा खूप लहान आहेत ते’ असं म्हणत सायलीने या चर्चांना पूर्णविराम दिला.
दरम्यान, सुबोध भावेंनी सायली कॉलेज जीवनात अनेक मुलांना प्रपोज करायची असं सांगून बॉम्ब टाकला. त्यानंतर एकामागून एक किस्से बाहेर येत असताना, विजांची भीती वाटते म्हणून मुलांना प्रपोज करायचीस का? कपाट आवरण्याचा कंटाळा येतो म्हणून करायचीस का? असं विचारत भंडावून सोडलं. त्यावर सायलीनेही ‘त्यातला एक होता, खूप नीटनेटका होता, बॅगही उत्तम भरायचा, कपाटही रोज आवरायचा की काय, कारण मला आज कपाट आवरायचाय असं म्हणून तो एकदा अचानक निघून गेलेला’ असं साळसूदपणे सांगितलं. त्यावर ‘तिथेच तो नजरेत भरला का?’ असा सवाल सुबोध भावेंनी विचारला.