सरफराज खानची जागा खायला आला त्याचाच भाऊ आता त्यांचे नाते बदलणार वैरात Sarfaraz Khan

Sarfaraz Khan भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे. रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर 7 विकेट्सवर 219 धावा झाल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७३ धावा केल्या. याशिवाय एकही फलंदाज टिकू शकला नाही. सध्या ध्रुव जुरैल आणि कुलदीप यादव हे नाबाद परतलेले फलंदाज आहेत. दोघांनी अनुक्रमे 30 आणि 17 धावा केल्या आहेत.

 

इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला. राजकोट कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावून वाहवा मिळवणारा फलंदाज सरफराज खान रांची कसोटीत विशेष काही करू शकला नाही. 53 चेंडूत 14 धावा करून तो बाद झाला. एकीकडे सरफराज खान रांची कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरला आहे. दुसरीकडे, सरफराजचा भाऊ मुशीर खानने अप्रतिम खेळी केली आहे. मुशीरने अशीच चांगली फलंदाजी सुरू ठेवली तर त्याचाच भाऊ मुशीर खान सरफराज खानचा शत्रू होईल.

मुशीरने रणजीमध्ये द्विशतक झळकावले खरं तर, रणजी ट्रॉफी २०२३-२४ हंगामात नुकतेच बाद फेरीचे सामने सुरू झाले आहेत. सध्या आठ संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. बडोदा आणि मुंबईविरुद्धही सामने होत आहेत.

ज्यामध्ये मुंबईने पहिल्या डावात 384 धावा केल्या, या धावांपैकी 203 धावा एकट्या सरफराज खानचा भाऊ मुशीर खानच्या आहेत. बडोद्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 357 चेंडूत 203 नाबाद खेळी खेळली होती. मुशीरने 18 चौकार मारले आहेत. या खेळीनंतर अनेक भारतीय क्रिकेट समर्थक सोशल मीडियावर मुशीरचे कौतुक करत आहेत.

Leave a Comment

Close Visit uttamsheti