वेळेचा सदुपयोग… चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत सारा पोहोचली शुटींगसाठी..

बॉलीवूडमध्ये नेहमीच आपल्या हटके आणि चुलबुल्या अंदाजाने चाहत्यांच्या चर्चेचा विषय असणारी अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सारा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.दरम्यान, साराचा एक व्हिडियो व्हायरल होतो आहे.

नुकताच साराने एक खास व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला असून या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाहीतर साराचा हा व्हिडीओ पाहून चाहते कमेंट करत काैतुक करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी साराने पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

नुकताच सारा अली खानने वेळ वाचवण्यासाठी अलिशान कार सोडून मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केला. या प्रवासामध्ये तिने एक खास व्हिडीओही शूट केलाय. सारा अली खान हिच्यासोबत तिची टीम देखील होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला. परंतू चाहत्यांना ओळखू येऊ नये याकरिता तिने मास्क देखील परिधान केला आहे. या प्रवासामध्ये सारा तिच्या नेहमीच्या मस्ती करण्याच्या अंदाजमध्ये दिसली. इतकेच नाहीतर यावेळी ती गाणे म्हणताना देखील दिसलीये.

सारा अली खानचा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. इतकेच नाहीतर लोकल ट्रेननंतर तिने रिक्षाने प्रवास केला. याचाही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.साराने व्हिडिओला कॅप्शन दिले होते, “नमस्ते दर्शको. आज आम्ही आमच्या मेंदूचा वापर केला, समय का सदूपयोग आम्ही ट्रेन घेतली.”

“नमस्ते दर्शको, जैसे आप देख सकते हैं आम्ही लोकल ट्रेनमध्ये आहोत, कारण या वेळी ट्रॅफिक आम्हाला वेडा बनवते, म्हणून आम्ही हे पाठदुखी सहन करत आहोत. पण, वेदना नाही. काही फायदा नाही. आता आपण जाऊन एका यादृच्छिक गल्लीतून रिक्षा पकडणार आहोत.” साराने टीम सदस्यासोबत तिच्या रिक्षा प्रवासाची झलक दाखवत तिने हा व्हिडिओ शेयर केला आहे.

दरम्यान, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख आणि पंकज त्रिपाठी आणि अनुपम खेर यांच्या सहकलाकार असलेल्या अनुराग बसूच्या ‘मेट्रो इन डिनो’साठी साइन तिने अप केले. याशिवाय, तिच्याकडे लक्ष्मण उतेकरचा विकी कौशलसोबतचा पुढचा चित्रपट, विक्रांत मॅसीचा सहकलाकार असलेला ‘गॅसलाइट’ आणि ओटीटी चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ देखील आहे ज्यात ती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप