दीपिका, आलियाला मागे टाकत समंथा बनली सर्वात महागडी अभिनेत्री..यादी झाली जाहीर

0

समंथा रुथ प्रभू, ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सर्वात आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेकदा तिच्या जोरदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्री म्हणून तिची पात्रता सिद्ध केली आहे. तथापि, ती आता चित्रपटांमध्ये तिचे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि OTT मालिकेद्वारे बॉलीवूडमधील तिची पदार्पण भूमिका, द फॅमिली मॅन या तिच्या भूमिकेसाठी तिचे कौतुक झाले. मात्र, नुकताच तिचा यशोदा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिसाद देत या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले.

दरम्यान, तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे ज्यामुळे सर्वच आनंदात आहेत. नुकतीच एक यादी देखील जारी केली गेली आहे जिथे ती भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

अलीकडेच, समंथाला मायोसिटिस या आजाराचे निदान झाले होते जे तिने सोशल मीडिया द्वारे स्पष्ट केले होते. ज्यासाठी तिला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, ती पुन्हा एकदा तिच्या जिद्दीने उभी राहिली आहे आणि ती आता कंबर कसून तिच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.  ती पुढील चित्रपटात विजय देवराकोंडासोबत स्क्रीन शेयर करणारा आहे.

सध्या समांथा रुथ प्रभूची गणना दक्षिणेतील लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.दक्षिणेतील चित्रपट निर्मातेच नाही तर बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांनाही समांथासोबत काम करायचे आहे.लोकप्रियतेच्या बाबतीत समांथा रुथ प्रभूने आलिया भट्टला कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणलाही मागे टाकले आहे.समांथा रुथ प्रभू सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील नंबर वन स्टार बनली आहे.

ऑरमॅक्स मीडियाच्या ऑक्टोबरच्या यादीनुसार, आलिया भट्टच्या खालोखाल समंथा रुथ प्रभूने ‘भारतातील सर्वात लोकप्रिय महिला स्टार’ हा किताब पटकावला आहे. त्यांच्या ट्विटनुसार, तिने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि इतर दक्षिण भारतीय अभिनेत्रींना मागे टाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ट्विट लाईव्ह होताच समांथाच्या चाहत्यांनी तिचे कौतुक करण्यास सुरुवात केली. मात्र, इंस्टाग्रामवर या यादीला नेटकऱ्यांचा अतिशय भन्नाट असा प्रतिसाद मिळाला. एका युजरने लिहिले, “जर ती इतकी लोकप्रिय आणि नंबर १ आहे……. तर दीपिका पदुकोणचे इंस्टाग्रामवर ७० दशलक्ष फॉलोअर्स का आहेत आणि सामंथाचे इन्स्टाग्रामवर २४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यावरून त्यांचा आनंद स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.