सलमानने चक्क भारतीच्या मुलाला भेट केला पनवेलचा फार्महाऊस..

0

छोट्या पडद्यावर बिग बॉस हा असा एकमेव वादग्रस्त शो असावा जो गेले इतके सिझन चाहत्यांच्या मनात घर करून आहे. सध्या या शोचा १६वा सिझन  लोकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. शोमध्ये जेव्हा वीकेंड का वार येतो, आला की चाहत्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली असते.  सोबतच या शोचा अनोखा क्रायटेरिया शो खास बनवतात. शिवाय शो अधिक दमदार बनवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला नवनव्या पाहुणे  कलाकारांना बिग बॉसच्या घरी घेऊन येतात. 

दरम्यान, बिग बॉस १६ च्या या शुक्रवार का वारमध्ये भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया आणि लक्ष्य सिंह लिम्बाचिया  यांनी एन्ट्री केली. त्यांनी सलमान खानसोबत खूप सारी मस्ती केली. यावेळी सलमान खानचा पनवेलवाला फार्महाऊस चक्क भारतीच्या मुलाला भेट दिल्याची बातमी समोर येत आहे. 

कलर्सने या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान भारती-हर्षचा मुलगा गोलासोबत ‘बेबी को बस पास है’वर एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान, हर्ष आणि भारती स्टेजवर येतात आणि भारती म्हणते- ‘सर, तुम्ही विवाहयोग्य आहात. आपण मुलाला हाताळू शकता, आपण मुलाला ५ मिनिटे सांभाळले. त्यानंतर भारती तिच्या मुलाचा ऑटोग्राफ घेते आणि नंतर सवयीप्रमाणे जोक करते की तिला सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसच्या कागदपत्रांवर सही मिळाली आहे. हे पाहून सलमानही हसायला लागतो.

बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसोबत खूप मस्ती करता करता भारती एका कागदपत्रावर सलमानची सही घेते. आणि म्हणाली की, थॅक्यू. तुम्ही पनवेलवाला फार्महाऊस लक्ष्यच्या नावे केला, सामान कधी हटवणार?

यानंतर सलमान खान खूप हसतो. सलमान खानने लोहिरीच्या निमित्ताने लक्ष्यला एक खास भेटवस्तू दिली. सलमान घालतो तसा खास ब्रेसलेट त्याने लक्ष्यलाही भेट म्हणून दिले. पुढे भारती सलमानला म्हणाली,  भाई लक्ष्यलादेखील लॉन्च करा आणि गर्लफ्रेंड्स कसे करायचे याची आयडियादेखील दिली. सलमान खान हसत हसत म्हणतो आणि म्हणतो माझं स्वत:चं नाही बनली.हा वीकेंड खूप मजेशीर राहणार आहे.

विशेष म्हणजे एकीकडे सलमान खान बिग बॉससाठी चर्चेत आहे, तर दुसरीकडे प्रेक्षक त्याच्या टायगर ३ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याशिवाय सलमानच्या आगामी चित्रपटांच्या खात्यात किक २, किसी का भाई किसी की जान, सूरज बडजात्यासोबतचा चित्रपट आणि नो एंट्रीचा सिक्वेल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शाहरुख खानच्या पठाणमध्ये सलमान खान एक कॅमिओ करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप