या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोबत सलमानने गुपचूप उरकला साखरपुडा?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वात दीर्घकालीन द मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून बॉलिवूडचा भाई सलमान खान आजही अनेक तरुणींचे मन हेरण्यात अव्वल आहे. आजवर त्याच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर आल्या, इतकाच काय तर नेटकऱ्यानी तर त्याचा फोटो एडिट करून लग्न झालेय असे भासवले होते. पण आता जी बातमी समोर येतेय त्यामुळे चाहते कमालीचे खुश झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी अशी की प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे…

सलमान खानच्या लग्नाबाबत बर्‍याचदा अनेक अफवा समोर आल्या आहेत. आजवर त्याचे अनेक अभिनेत्री बरोबर नाव जोडले गेले आहे मात्र आजपर्यंत त्याने लग्न केलं नाही. आणि आता चक्क सलमानच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. खरतंर ही बातमी जरी जुनी असली तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा या बातमीने हलकल्लोळ मजवला आहे.

सलमानच्या साखरपुड्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमानने सोनाक्षी सिन्हासोबत साखरपुडा केल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोत सोनाक्षीच्या भांगेत सिंदूर भरलेलं दिसत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटोमागचं सत्य सांगणार आहोत.

सलमान आणि सोनाक्षीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असंही म्हटलं जातं की, या दोघांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचं सत्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हा फोटो खरा नसून हा फोटो पुर्णपणे एडिट करण्यात आला आहे. यावर फोटोशॉप करण्यात आलं आहे. खरंतर सलमान आणि सोनाक्षीचं लग्न झाल्याची ही बातमी पुर्णपणे खोटी आहे.

यावर प्रतिक्रिया देत सोनाक्षी म्हणाली, लोक इतके मूर्ख आहेस की खर्‍या आणि मोर्फड फोटोंमध्ये फरक करू शकत नाहीस. यासोबतच त्याने कमेंटमध्ये हसणारे इमोजीही वापरले होते.सोशल मीडियावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले – तुमच्या कलेचा चांगल्या ठिकाणी वापर करा. एखाद्याचे फोटो असे मॉर्डिंग करणे चुकीचे आहे. या सर्व अफवा पाहता सलमान खानने आता लवकरच लग्न करावं अशी इच्छा त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.

त्याचबरोबर सोनाक्षीचे नाव झहीर इक्बालसोबत जोडले जात आहे. मात्र, सोनाक्षीने झहीरसोबत संबंध असल्याचा नकार दिला आहे. दबंग गर्लने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की ती झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये नाही. झहीर फक्त त्याचा चांगला मित्र आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप