अखेर सल्लू भाई बनला दुल्हा.. या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ?

0

नुकताच सलमान खानचा ५७ वा वाढदिवस साजरा झाला. अद्याप त्याने अजून लग्न केलेलं नाही आणि तो आजवरचा सर्वात लोकप्रिय बॅचलर आहे. त्याचे जगभरातील चाहते आणि कुटुंबीय त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही तरुणी तर त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्न आजही पाहतात. दरम्यान, त्याच्या लग्नाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बॉलिवूडमधील सर्वात मोस्ट एलिजिबल बॅचलर सर्वांचा लाडका सल्लू भाई नेहमीच त्याच्या अफेरच्या अफवांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आजवरच्या ट्रॅक प्रमाणे अनेक सुंदर आणि प्रसिध्द अभिनेत्रींसोबत त्याच नाव जोडलं गेलं आहे. अशातच सलमान खान कधी लग्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सध्या सलमान आणि एका सुंदर अभिनेत्रीचा लग्न केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सलमान खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दुसरी तिसरी कोणी नसून साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आहे. हे फोटो पुर्णपणे खोटे असून फोटोशॉप करण्यात आले आहे. यामध्ये दुसऱ्याच्या फोटोवर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो खोटा आहेसलमान खान आणि रश्मीकाचा हा  फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोघंही हसताना दिसतायेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो खोटा आहे. या फोटोचे उघड सत्य हेच की, त्यांचं लग्न झालेलं नाही. ही केवळ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली अफवा आहे. 

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. रश्मिका आणि सलमानच्या चाहत्यांना असा समज आहे की, या जोडीने गुपचूप लग्न केलं आहे, पण सत्य हे आहे की सलमान खान अजूनही बॅचलर आहे. रश्मिका आणि सलमानचा व्हायरल झालेला हा फोटो फोटोशॉप करण्यात आला आहे, आणि या दोघांना या गोष्टीची खबर देखील नाही.

दरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी रश्मिका आणि सलमानने एक गाणं शूट केलं होतं. सलमानच्या शोमध्ये सामी सामी या गाण्यात रश्मिका आणि सलमानची जोडी पाहायला मिळाली. या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता एका चाहत्याने या चेहऱ्याचे फोटोशॉप करून दोघांच्या लग्नाचा फोटो बनवला आहे.

मध्यंतरी सलमान आणि सोनाक्षी सिन्हाचा असाच एक फोटो एडिट करण्यात आला होता. त्याही वेळी त्यांचे लग्न झाले अशी अफवा उठवण्यात आली. पण फोटो व्हायरल करणाऱ्या लोकांना मूर्ख म्हणत सोनाक्षी ने चांगलेच खडे बोल सुनावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप