सलमान खानने बिग बॉस 16 साठी केली तब्बल इतक्या कोटींची डिमांड! मानधन ऐकून बसेल मोठा धक्का!!

गेली कित्येक सीजन कलर्स टीव्ही वाहिनीवरील बिग बॉस या लोकप्रिय रियालिटी शोचा होस्ट हा सलमान खानच राहिलेला आहे! या शोचं होस्टिंग करताना सलमानला पाहणे हे त्याच्या चाहत्यांना देखील आवडत आहे. पण यावेळी हा शो करण्यासाठी सलमानने मागितलेल्या मानधनाचा आकडा वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल!!

 

छोट्या पडद्यावरचा गाजणारा आणि तितकाच प्रसिद्ध देखील होणारा सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस! त्याचे वेगवेगळे सीजन दरवर्षी प्रदर्शित होत असतात. यंदा देखील ‘बिग बॉस 16’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी या सिझनचे होस्टिंग कोण करणार? असा प्रश्न अनेक बिग बॉसच्या चाहत्यांना पडला असेल, तर यासाठीची मोठी बातमी म्हणजे यंदाचा सीजनही सलमान खान हाच होस्ट करताना दिसणार आहे. पण याची खरी मोठी बातमी पुढे आहे, ती म्हणजे हा सीजन होस्ट करण्यासाठी सलमानने किती मानधन मागितले आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? त्याने सांगितलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल!!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दबंग भाईजानने बिग बॉस 16 साठी त्याच्या आधीच्या सीजन मधील मानधनापेक्षा तिप्पट जास्त मानधनाची मागणी केली आहे!! मागील अनेक सीजन पासून सलमान आपलं मानधन वाढवण्याची मागणी वेळोवेळी करत होता, परंतु कोरोना महामारीमुळे त्याला मानधनांमध्ये तडजोड करावी लागली होती. पण आता स्थिती आधी पेक्षा चांगली असल्याने सलमानने या शोसाठी त्याचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार बिग बॉस च्या शोमेकर्स कडे सलमानने त्याचे मानधन तिप्पट दरात वाढवण्याची मागणी केली आहे. बिग बॉसच्या मागच्या म्हणजेच 15 व्या सीजन साठी सलमान खानने 350 कोटी रुपये रक्कम घेतल्याची चर्चा पसरली होती. त्यानुसार हिशोब केला तर बिग बॉस 16 या सीझनसाठी त्याने 1050 कोटींची डिमांड केली असल्याची शक्यता आहे. मात्र या बातमीला अजून तरी कोणताही अधिकृत पुरावा मिळालेला नाही, पण सलमान खान बिग बॉस मध्ये असल्यामुळे त्याच्या होस्टिंग वर फिदा होऊन प्रेक्षक हा शो बघतात ही गोष्ट ही तितकीच खरी आहे! त्यामुळे सलमान खानची ही डिमांड पूर्ण झाली तर तो टीव्ही इंडस्ट्री मधील आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा होस्ट ठरणार आहे एवढे नक्की!

मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉस 16 यातील स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांचा शोध सध्या सुरू आहे, याकरिता या शोच्या मेकर्सने अनेक सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. यामुळेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलमान खान या शोचा पहिला प्रोमो शूट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti