मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक मालिका प्रदर्शित झाल्या आहेत, आणि अनेक मालिका कार्यरत आहेत. यातील कलाकार रोज आपल्या खास भूमिकेत रसिकांना भेटत असतात त्यामुळे रसिकांचे आणि कलाकारांचे नाते खूप जवळचे बनून जाते. आपण मालिकेत अनेक बालकलाकारांना आपण पाहतो, हे बालकलाकार अतिशय उत्कृष्ट अभिनय साकारतात. त्यांच्या इवल्याशा हावभावातून खूप मोठाले भाव स्पष्ट होतात त्यामुळे प्रेक्षक मंडळी त्यांची भूमिका खूप आवर्जून पाहतात. त्यांचे सर्वानाच खूप कौतुक वाटते, अशीच एक लाडकी बालकलाकार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मित्रहो “रंग माझा वेगळा” ही मालिका तुम्हाला माहीतच आहे, अवघ्या महाराष्ट्राला या मालिकेने विशेष वेड लावले आहे. यातील छोटी कार्तिकी सर्वाना खूप आवडते, या भूमिकेत साईशा भोईर दिसली होती. आता साईशा एका नव्या मालिकेत झळकणार आहे, तिच्या निरागस अभिनयाने ती पडद्यावर खूप गाजली आहे. तिची लोकप्रियता आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर आहे. “रंग माझा वेगळा” मालिका खूप छान आहे, माणूस दिसण्यावर नाहीतर त्याच्या चांगल्या स्वभावावरून ओळखता आला पाहिजे. माणुसकी जपणारी माणसे आपल्या जवळ असणे आवश्यक असते.
View this post on Instagram
कार्तिकी म्हणजेच साईशा ही अट इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे, तिला शाळेत जायचे होते शिकण्यासाठी, तिची शाळेत जाण्याची इच्छा आहे असे म्हणत तिच्या पालकांनी मालिकेतून एक्झिट घेतली होती. तिच्या पालकांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले, मात्र साईशा कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार नाही हे जाणून सर्व चाहते नाराज झाले आहेत. या भूमिकेत तिला पाहण्यासाठी नेहमीच सर्वजण आतुर असायचे, पण मित्रहो आता साईशा पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहे.
मालिकेतून एक्झिट घेतलेली साईशा आता झी मराठी वाहिनीवरील एका नवीन मालिकेत झळकणार आहे. “नवा गडी नवं राज्य” असे या नवीन मालिकेचे नाव आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील व अभिनेता कश्यप परुळेकर यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. तसेच यामध्ये बालकलाकार साईशा भोईर, वर्षा दांदळे, अनिता दाते, यांसारखे बरेचसे बालकलाकार पाहायला मिळणार आहेत. ही नवीन मालिका नक्कीच एक खास कथानक घेऊन येणार आहे, त्यामुळे याचा व्हायरल झालेला प्रोमो सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर या प्रोमोची खूप चर्चा होत आहे, यामध्ये अनिता दाते ही फोटो फ्रेम मध्ये पाहायला मिळते. तिने काही दिवसांपूर्वी आपला हार घातलेला स्वतःचा फोटो शेअर केला होता. अनेकांना आश्चर्य वाटल्याने या फोटोवर खूपशा कमेन्ट आल्या होत्या. पण यामागील कारणाचा उलगडा झाला असून अनिता दाते या नवीन मालिकेत महत्वाचा भाग आहे. यामध्ये साईशा देखील एका खास भूमिकेत झळकणार असून तिला सुद्धा यामध्ये अभिनयाची संधी मिळणार आहे. ती लवकरच एका नवीन प्रोजेक्ट मधून समोर येणार आहे असे तिच्या आई बाबांनी सांगितले होते.
ही मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून रात्री ९:०० वाजता प्रसारित होणार आहे, ही मालिका तुम्ही नक्की पहा आणि यातील कलाकार व त्यांच्या भूमिका कशा वाटतात ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.