मेव्हण्याच्या लग्नात रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांनी लावले जोरदार ठुमके.पहा भन्नाट व्हिडिओ

भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे खेळत नाहीये. तो सध्या आपल्या मेव्हण्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी निघाला आहे. त्याच्या मेव्हण्याच्या  लग्नाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहसोबत डान्स करताना दिसत आहे. दोघांनी पंजाबी गाण्यावर जोरदार डान्स केला. हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे पहिल्या वनडेत भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहित मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hitman Hargun Godara (@rohitworld45_)

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप