वैयक्तिक आयुष्याबाबत रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला – आम्ही दोघंही सिगारेट व दारू…

0

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या वेडने वेडे करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुखचा बोलबाला आहे. वेड हा चित्रपट जरी तमिळ चित्रपटाचा रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय चाहत्यांना वेड लावतो आहे.

चित्रपटातील सत्या आणि श्रावणीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.वेड या चित्रपटाने ५ दिवसात १५ कोटींचा व्यवसाय केला आहे, जे पाहून ट्रेड एक्सपर्ट्सही चांगलेच खूश आहेत. वेड्स चित्रपटाच्या कमाईने अवघ्या चार दिवसात चित्रपटाने जवळपास १३ कोटींचा टप्पा पार केलेला दिसून येत आहे. आणि अजूनही हा चित्रपट चाहत्यांना आकर्षित करत आहे.

दरम्यान, चित्रपटातील एका सीनमुळे रितेशला त्याच्या मुलांनी एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न म्हणजेच तुमच्या तोंडात ते काय आहे? रितेशने वेड चित्रपटासाठी तोंडात सिगरेट घेतलेली पाहून मुलांनी हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला.रितेशने त्यांना सरळ जे आहे तेच खरे उत्तर दिले. प्रश्नावर उत्तर देताना रितेश म्हणाला की, माझ्या मुलांनी माझ्या तोंडात काय आहे ते विचारलं. ते म्हणाले की आम्ही इतर लोकांच्या तोंडात सुद्धा हे पाहिलं आहे. मी त्यांना सांगितलं की सिगारेट ही आरोग्यासाठी धोकादायक आहे. मी ही गोष्ट कधी करत नाही. आम्ही दोघे पण सिगरेट आणि दारू पित नाहीत, हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

सोबतच सिनेमा प्रदर्शित होताना जिनिलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तर तिने कॅप्शन लिहिले की, ‘रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझंही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.’ जिनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओला एका यूजरने ‘मराठी नसून ऐवढ छान मराठी बोलणे सोप्पे नाही, अशी कमेंट्स केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

चित्रपटातील गाणी लोकप्रिय संगीतकार जोडी अजय अतुल यांनी रचली आणि गायली आहेत. तर वेड चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुखने केले असून चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. सोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे हे सर्व कलाकार मुख्य भुमिकेत दिसत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप