सर्वांना “वेड” लावण्यासाठी परफेक्ट कपल रितेश आणि जेनेलिया येणार १० वर्षांनी पडद्यावर एकत्र..

0

मराठी आणि हिंदी चित्रटसृष्टीतील क्यूट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रितेश देशमुख आता दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा परतणार आहे. आणि सोबत जेनेलिया देखील त्याच्यासोबत दिसून येणार आहे. या दोघांची जोडी परफेक्ट कपल म्हणून चांगलीच लोकप्रिय आहे. त्यांचे सोशल मीडियावर वारंवार पोस्ट्स व्हायरल होत असतात.

दोघेही त्यांचे फनी रिल्स बनवून पोस्ट करत असतात जे काही वेळातच व्हायरल देखील होतात. सिनेमाने यांची जोडी बनवली हे तर सर्वांना ठाऊकच आहे. त्यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केले आहे. आणि आता तब्बल १० वर्षांनंतर हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील चांगलेच उत्सुक आहेत.

जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.पण आता वेड या त्यांच्या ब्रँड न्यू चित्रपटातून दोघे पुन्हा एकदा स्क्रीन शेयर करणार आहेत. तर या चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे! दरम्यान, जेनेलिया ने लय भारी या चित्रपटाची निर्माती होती. पण पहिल्यांदाच ती मराठी सिनेमात अभिनय देखील करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या चित्रपटाबद्दल रितेश देशमुख म्हणाला की, “मी नर्व्हस होतो. तरीही थोडा नर्व्हस होतो. जेनेलिया आणि मी काही काळापासून काम करत आहोत. आणि आता ते रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला वाटतं शुभ दिवाळी पाडवा हा पहिला लूक दाखवण्याची योग्य वेळ होती. आम्ही यावर खूप मेहनत घेतली आहे. सर्वांना ते आवडेल अशी आशा आहे.” रितेश जेनेलिया शेवटचे २०१२ साली तेरे नाल लव्ह हो गया चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर आता १० वर्षानंतर ते वेड चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

जेनेलिया डिसुझा देशमुखने ट्विटरवर वेड चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, “माझा जन्म महाराष्ट्रातलाच. मी अभिनयाला सुरुवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले. तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.”

वेड या चित्रपटातून मराठी अभिनयात पदार्पण तर करणार आहेच सोबतच जेनेलिया देशमुख या चित्रपटाची निर्मातीही आहे. अजय आणि अतुल यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ३० डिसेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप