मराठमोळा लूक आणि त्यावर भक्तीचा नाद रींकूने शेयर केले गणेश उत्सवाचे खास फोटोज्…

0

घरोघरी बाप्पाच्या आगमनाने एक वेगळाच उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. कलाकारांच्या घरी देखील जोरदार पद्धतीनं बाप्पाचे स्वागत केले जाते आहे. ढोल ताशाच्या गजरात विघ्नहर्त्याच्या आगमाचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सैराट फेम रिंकूने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बाप्पाच्या स्वागताचे फोटोज् शेयर केले आहेत. पाहा कसे केले रींकुने बाप्पाचे जोरदार स्वागत आजच्या या लेखात…

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातून प्रत्येकाला सैराट करून सोडणारी रिंकू आज यशाचे शिखर गाठत आहे. आपल्या हटके अंदाज आणि बोलीभाषेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत तिने आता आपल्या ॲक्टिंग करियरची सुरुवात केली आहे.

रिंकूने नुकताच तिचा खास गणेशोत्सव लुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या फोटोजमध्ये रिंकू पारंपरिक मराठमोळ्या अवतारात आपल्याला दिसत आहे. खूप आनंदाने तिने गणरायचे स्वागत केले आहे. रिंकू आनंदाने गणरायाची पूजा करतानाचे ही फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सोबतच रिंकूने या पोस्टमध्ये ढोल वादनाचे फोटोजही शेअर केले आहेत. ढोल वादन करताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान फोटोमध्ये अगदी योग्य पद्धतीने टिपलं गेलं आहे.गुलाबी मराठमोळी साडी आणि वेगवेगळे दागिने यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट चा पाऊस पाडत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सैराट सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळाच इतिहास रचत एक नवी दिशा दिली आहे. उत्कृष्ट पद्धतीने कॅमेरा बद्ध केलेल्या या चित्रपटाला बॉलिवूडच काय अख्ख्या जगाला दखल घेण्यास भाग पाडले. सैराट’मध्ये काम करत असताना रिंकू शाळेत शिकत होती. एवढी लोकप्रियता मिळूनही ती दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली.तिचा ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू?” “आलाय साबण लावून तोंडाला”, “थेट रानात चालली” असे काही डायलॉग्ज प्रचंड गाजले. रिंकूने यानंतर २०० हल्ला हो, कागर अशा मराठी तर अभिनेता अमिताभ बच्चन अभिनित झुंड सिनेमातून हिंदी चित्रपसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. यामध्ये तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूक दाखवली.

त्यामुळे तिला वारंवार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, ती सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना डेली अपडेट्स देत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप