‘तारक मेहता..’ मध्ये होणार या कलाकाराची रीएंट्री? दयाबेन की मेहता साहेब, कोण परतणार?
तारक मेहता का उलटा चष्मा ही छोट्या पद्दयावरील दिर्घकाळ चालणारी आणि त्याच लोकप्रियतेने चालणारी एक कौटुंबिक मालिका आहे. या मालिकेतील जितके पात्र आहेत ते आता प्रेक्षकांच्या घरचेच झाले आहेत. त्यामुळे मालिकेत येणारे हास्य पर प्रसंग चाहत्यांच्या मनाला भावतात. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची आपली एक जागा निर्माण करून आहेत. पण दरम्यान, मालिकेतून काही लोकप्रिय पात्रांनी अचानकपणे एक्झिट घेतल्यामुळे चाहते मालिकेच्या निर्मात्यांवर नाराज झाले आहेत. दयाबेन, टपू, आणि मेहता साहेब ही काही प्रमुख पात्रे मालिकेत गेल्या काही काळापासून दिसत नाहीयेत. पण आता मालिकेत कोणाची तरी दर्जेदार एंट्री नक्की होणार आहे. त्यामुळे मालिकेत नक्की कोण कमबॅक करेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, सोशल मीडिया आणि टिव्ही चॅनल वर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये जेठालालसाठी एक आनंदाची बातमी आहे. असे चित्र दिसून येत आहे.
या प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे बाघा आणि नटूकाका
जेठालालला फोन वर खास खुशखबर असल्याचे सांगत आहेत आणि त्यावर म्हणत आहेत की ती खबर त्याला दुकानवर आल्यावरच सांगेल असेही म्हणतो. त्यामुळे उत्सुकता आणि राग या दोहोंचा संगम होऊन जेठालालची झालेली हालत लक्षात येत आहे. आता ही खुशखबर काय असेल याकडे फक्त जेठालाल नाहीतर मालिकेच्या चाहत्यांना ही उत्सुकता लागली आहे की काय खुशखबर असेल?
याबाबत सोशल मीडियावर चांगलच चर्चासत्र रंगले आहे. कोणी कयास बांधतो आहे की, मेहता साहेब पुन्हा मालिकेत परतणार तर कोणाला वाटत आहे की दयाबेन परत येणार.. तर दरम्यान, मालिकेत जुना टपू अर्थात भव्य गांधी मालिकेत रीएंट्री करेल याबाबत व्हिडिओज व्हायरल होत आहेत. पण असं काही नसून जेठालालला अमेरिकेला जाण्याची संधी मिळणार आहे. आणि ही बातमी पहिल्यांदा बाघा आणि नट्टू काकांना कळते. ते आनंदी होतात आणि जेव्हा जेठालाल दुकानात दाखल होतो नाचत नाचत ही बातमी जेठालाल यांना सांगतात. जेठालाल हे ऐकून आश्चर्यचकित होतात.
आता ही बातमी किती खरी आहे? जेठालालला हे सर्व स्वप्नात दिसतय का?, की जेठालाल खरंच अमेरिकेला जाणार? आणि जर ते खरे असेल तर जेठालालला का आणि कोण अमेरिकेला पाठवत आहे? हे मालिकेच्या आगामी भागात कळेलच, नाही का?