सर्वांची लाडकी श्रीवल्ली धरणार ठेका लावणीचा : झी मराठी अवॉर्डसच्या मंचावर रंगणार रश्मिकाच्या अदाकारीचा सोहळा
संपूर्ण भारताची नॅशनल क्रॅश म्हणून ओळखली जाणारी श्रीवल्ली अर्थात अभिनेत्री रश्मिका मांदना तिच्या क्यूट आणि हॉट अदाकारी मुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या खास अंदाजाने ऑन स्क्रिन तसेच ऑफ-स्क्रीन व्यक्तिमत्व टिकवून चाहत्यांना आपलेसे करत मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग मिळवला आहे. जवळजवळ प्रत्येक चित्रपटसृष्टीत तिचा ठसा उमटवण्याचा ती नक्कीच प्रयत्न करत असते. अलीकडेच, तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनीत असलेल्या गुडबाय या हिंदी चित्रपटात पदार्पण करून लाखो मने जिंकली. आणि रश्मिका आता तिच्या मराठमोळ्या अंदाजाने लाखो चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
रश्मिका झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कार 2023 मध्ये चक्क लावणी करताना दिसणार आहे. होय, २६ मार्च रोजी होणाऱ्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात रश्मिका मंदान्ना ही लावणीच्या ठेक्यावर ताल धरताना दिसून येणारं आहे. अस्सल मराठी मुलीप्रमाणेच ती लावणी सादर करणार आहे.. झी मराठीच्या ऑफिशिय इंस्टाग्राम अकाऊंट वर या कार्यक्रमाचा प्रोमो देखील प्रसारित करण्यात आला आहे.
लावणीच्या पारंपारिक वेशात रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे. प्रोमोमध्ये ती गुलाबी बॉर्डर असलेल्या पांढऱ्या साडी मॅचिंग गुलाबी ब्लाउजमध्ये अस्सल मराठी मुलगी दिसत आहे. जे चाहत्यांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. झी मराठीने क्लिपला मराठीत कॅप्शन दिले आहे की, “रश्मिकाची अस्सल मराठमोळी अदाकारी.. चर्चा रंगणार बातमी गाजणार. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 26 मार्च, रविवार, संध्या. 7 वा.”
विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल.सध्या ती कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या 4 भाषांमध्ये काम करत असल्याचे समोर आले.
View this post on Instagram
यंदाच्या सोहळ्यात बऱ्याच खास गोष्टी पहायला मिळणार आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे मराठीचे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी खास जोडी सोबत थिरकताना दिसणार आहेत. याशिवाय विनोदाची आतिषबाजी करत प्रेक्षकांना लोटपोट करण्याचा बंदोबस्त केला गेला आहे. एवढंच नव्हेतर जेष्ठ मराठी व हिंदी अभिनेते अशोक सराफ यांना जीवन गैरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, रश्मिकाने याआधी साडी परिधान केली आहे. पण नऊवारी काष्टा मध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे. तर तुमच्या लाडक्या श्रीवल्लीचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ मध्ये रविवारी 26 मार्च संध्याकाळी 7 वाजता.