सध्या कलर्स मराठी चॅनलवर बिग बॉस मराठीचा चौथा सिझन मोठ्या दिमाखात सुरू झाला. बिग बॉस मराठीच्या घरात आता खरी रंगत येऊ लागली आहे. केवळ वादच नाही तर नवनवीन टास्क आणि ट्विस्टही येत आहेत. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू झाल्या झाल्या दोनच दिवसात वाद आणि भांडणांना सुरुवात झाली. शिवाय टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळ प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. गेली ९ दिवस १६ स्पर्धकांनी मिळून घरात आपापले स्थान निर्माण केले आहे.
बिग बॉसच्या घरात सध्या गेले उडत हा साप्ताहिक टास्क सुरू झाला आहे. या कार्यात घरात विमानतळ बनलं असून कुस्तीचा आखाडा तयार झाल्यानं दिसत आहे. आणि या आखाड्यात अक्षय केळकर आणि प्रसाद जवादे एकमेंकांमध्ये चांगलेच भिडले. त्यांची ही भांडणे बघून घरातील बाकी सगळे सदस्य लांब गेल्याचेही दिसले.
दरम्यान, गेला उडत या टास्कमध्ये एकमेकांच्या नावाच्या बॅग घेऊन आपल्या नावाची बॅग ज्याच्या हातात असेल त्या स्पर्धकाला सेफ करायचं असा नियम बनवण्यात आला.मग काय या टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपलेली पाहायला मिळाली. तर मेघा समोरच्या टीमवर दोन दोन बॅग धरून ठेवल्या आहेत ते दिसत नाहीये का असा आरोप करताना दिसून आली.
तिच्या या वक्तव्यावर किरण माने चांगलाच भडकलेला दिसून आला. ‘मी बघितलं आहे, कॅमेराने देखील बघितलं आहे. बॅगा अशा वाटलेल्या आहेत क्लिअर दिसतं आहे आणि आम्हांला सांगतं आहेत. कॅमेरा बघतो आहे, लाज बाळगा’, असं किरण माने म्हणताना दिसून आला. तर दुसरीकडे, प्रसाद आणि अक्षय यंनी घराला कुस्तीचा आखाडाच बनवला आहे. अक्षय आणि प्रसाद बॅग घेण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसून आले.
प्रसाद आणि अक्षयची भांडण पाहून समृद्धी अक्षयने सर्वात पहिली बॅग घेतली त्यामुळे प्रसाद त्याला सोडून दे असं म्हणते.इतकच नाही तर घरातील काही सदस्य देखील प्रसादला सांगत आहेत बॅग सोडून दे. पण दोघे हि बॅग सोडायला तयार नाहीये हे दिसून आले.
कोणाची बॅग कोणी घेतली यावरून सदस्य एकमेकांवर भिडले. त्यामुळे आजच्या भागात नेमकं काय घडणार. भांडण कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असले.त्याचप्रमाणे या टास्कवेळी सदस्यांनी आखलेला कुस्तीच्या डावावर मांजरेकर चावडी मध्ये नेमकी कशी प्रतिक्रिया देणार? ते यावर शिक्षा सुनावणार की आणखी काय टास्क देणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.