रंग माझा वेगळा फेम दिपाचे महाराष्ट्रीयन लुक मधील फोटो झाले व्हायरल..
माझा रुबाब हाय अनमोल मी हाय नाखवाची पोर..पाचे महाराष्ट्रीयन लुक मधील फोटो
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेने सध्या टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर आपली जागा नक्की केली आहे.ही मालिका अत्यंत रंजक पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. दीपावर गोळी झाडणाऱ्या आयेशाचा डाव आता उघडा पडला असून आणि पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्यामुळे मालिकेत आता अनेक ट्विस्ट येत आहेत.
रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे ने अत्यंत दमदार पद्धतीने साकारली आहे. कलाविश्र्वाप्रमाणे रेश्मा सोशल मीडियावरही नेहमी सक्रीय असते आणि वारंवार या माध्यमातून चाहत्यांना तिच्या खास क्षणाचे अपडेट देत असते.
दरम्यान रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. यात ती गुलाबी- सोनेरी कलरच्या नऊवारी साडीत एकदम हटके दिसत आहे. यासोबत तिने डिझाईन असलेले गोल्डन रंगाच्या ब्लॉऊजने चारचॉद लावले आहेत. केसाचा अंबाडा, केसांत फुले, गळ्यात नेकलेस आणि कोल्हापुरी हार, हातात सोनेरी बांगड्या, कानात मॅचिग झुमके, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिची लूक पुर्ण केला आहे.
View this post on Instagram
रेश्मा शिंदे हिने हा फोटो शेअर करत लिहिले की, माझा रुबाब हाय अनमोल मी हाय नाखवाची पोर.रेश्मा शिंदेने कोळीण लोकांचा गेटअप केलेला या फोटोत पाहायला मिळत आहे.रेश्मा शिंदेच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.रेश्मा शिंदे हिने मराठी व्यतिरिक्त हिंदी मालिकेतही काम केलेले आहे.
रेश्मा तिच्या पात्रामुळे सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. रेश्मा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तिने मागे सुद्धा तिच्या मैत्रिणींसोबत धमाल करतानाचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना पोट धरून हसायला लावलं होतं.
View this post on Instagram
दरम्यान रेश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला होत जो तुफान व्हायरल झाला होता. या स्पेशल व्हिडिओला ‘विविधतेत एकता ही इथे आहे’ अशी खास सुद्धा तिने दिल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम धर्मीय स्त्री एका लहानग्याच्या फोटो काढताना दिसत आहे. या लहान मुलाने गळ्यात माळ, धोतर कुर्ता घातलेला पारंपरिक वेष केला आहे. या वेशात हा मुलगा चक्क विठ्ठलाला भेटायला आलेल्या वारकऱ्यासारखा दिसत आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीच्या औचित्याची आठवण करून देणारा हा एक सुंदर व्हिडिओ आहे असं म्हटलं आत आहे.या व्हिडिओतून भारताची विविधता, महाराष्ट्राची परंपरा दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.