स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा मालिकेने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आणि त्याचे कारणही तितकेच खास आहे. मालिकेत दिपा आणि कार्तिक यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. त्यांना कार्तिकी आणि दीपिका या दोन्ही मुलींच्या जन्माचा आनंदही दोघांना एकत्र साजरा करता आला नाही. पण आता मात्र त्यांच्यामधील गैरसमज दूर झाले आहेत. आणि दीपा-कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण येऊ पहात आहेत. आपापसातले मतभेद, भांडण विसरुन दोघंही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत.
दीपा कार्तिक दुसऱ्यांदा लग्न करणार असून या मालिकेत लवकरच दीपा आणि कार्तिकचा शाही लग्न सोहळा चाहत्यांना पहायला मिळणार आहे. सौंदर्याच्या अथक प्रयत्नानंतर आता दीपा आणि कार्तिकमधले गैरसमज दूर झाले आहेत. आता दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मंदिरात जाऊन त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले आहे. मात्र, सौंदर्याने त्यांना अट घातली आहे. सौंदर्या त्यांना म्हणते की, ‘कार्तिक आणि दीपाने तेव्हा देखील असंच लग्न केलं. मला त्यावेळी देखील स्वतःची हौसमौज करता आली नाही. मात्र, यावेळी दोघांचं लग्न धुमधडाक्यात होणार आहे. सगळ्या विधी पूर्ण करून दीपा या घरात प्रवेश करणार आहे.’आता दीपा कार्तिकच्या लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
View this post on Instagram
इनामदार कुटुंबात दीपा – कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली असून मेहंदी, हळद, संगीत आणि लग्न सगळं अगदी साग्रसंगीत पार पडले आहे.दरम्यान दीपा कार्तिकचं लग्नदेखील थाटामाटात पार पडले असून त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
या फोटोत दीपा आणि कार्तिक वधू वराच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
दीपा कार्तिकच्या लग्नासाठी सगळेच आतुर आहेत पण विशेषतः या दोघांच्या मुली लग्नात धमाल करतायत.आमच्या आई-डॅडाच्या लग्नाला यायचं हं!’ असं म्हणत या दोघीनी सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे.
दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच दीपा कार्तिकचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे, असे कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष कुलकर्णीने म्हटले.
आता या दोघांचं लग्न सुरळीत पार पडणार कि मालिकेत अजून काही ट्विस्ट येणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.दीपा कार्तिकचे चाहते त्यांचा लग्नसोहळा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.