बिग बॉस मराठी ४’ म्हणजे छोटया पडद्यावरील रिॲलिटी शोज चा बॉस च मानला जातो. भांडण, राडा, यांनी परिपूर्ण हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही काळात सोशल मीडियावर फक्त आणि फक्त बिग बॉस ४चाच बोलबाला आहे. पण या चर्चेला पूर्णविराम देत कलर्स मराठी चॅनलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर प्रोमो जाहीर केला.आणि हटके अंदाजात महेश मांजरेकर यांनी बिग बॉस सुरू होण्याची जबरदस्त बातमी सांगितली.
View this post on Instagram
त्यामुळे आता पुन्हा एकदा स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील १०० दिवसांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. टास्क, वाद आणि राडा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतं. ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार हे यावर घमासान माजले होते. पण तेही मिटले सध्या शो मध्ये नक्की कोण कोण स्पर्धक असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी ४च्या स्पर्धकांमध्ये मराठी
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची नावे घेतली जात
आहेत. यात प्राजक्ता गायकवाड, तेजश्री जाधव, शर्वरी लोहकरे यांच्या नावांची चर्चा होताना दिसते आहे. पण यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे हार्दिक जोशीची. त्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार म्हणून चाहते उत्सुक तर आहेतच शिवाय तो असेल की नाही या चर्चांना उधाण आले आहे.
त्यामुळे आता तो कि बॉसच्या घरात दिसू शकतो, असा अंदाज लोकांनी त्यामुळे आता तो कि बॉसच्या घरात दिसू शकतो, असा अंदाज लोकांनी लावला होता. पण आता चर्चेवर पहिल्यांदाच हार्दिक जोशी ने मौन सोडले आहे.
हार्दिक जोशी याबाबत म्हणाला की, मी बिग बॉस मराठी ४ मध्ये जाणार की नाही? याचा प्रेक्षकांनी अंदाज लावावा.शेवटपर्यंत त्याची उत्सुकता राहिली पाहिजे. याबद्दल मी आत्ताच काही सांगणार नाही, माझे नाव सतत चर्चेत असले तरी सध्या तरी मला याबद्दल काहीच सांगायचे नाही. त्यामुळे हार्दिक जोशी बिग बॉसच्या घरात जाणार की नाही, हे लवकरच समजेल.
हार्दिक जोशीला बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी संपर्क साधण्यात आला आहे. पण अद्याप त्याने काहीही उत्तर दिलेलं नाही. हार्दिक सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच लवकरच तो अक्षय देवधरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.