ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ शेअर गुंतवणूकदार आणि अब्जाधीश उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. झुनझुनवाला यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. झुनझुनवाला यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि ते घरी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आकाशा एअरलाईन्स सुरू केली. झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
गेल्या महिन्यात वाढदिवस होता
काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी उघडली असून, प्रवाशांना कमी दरात सुविधा देण्यासाठी चर्चेत आहे. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. गेल्या महिन्यात, 5 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता, झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी ऐकून बाजारालाही धक्का बसला आहे.
शेअर बाजारातील बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या झुनझुनवाला यांच्याबद्दल असे म्हटले जात होते की, त्यांनी ज्या शेअरला हात लावला त्याचे सोने होईल. आकासा एअरलाइन्स सुरू करण्याआधी त्यांनी पीएम मोदींचीही भेट घेतली होती. सीएची पदवी घेतल्यानंतर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांचा विश्वास होता की, शेअर बाजारात नक्कीच गुंतवणूक करावी.
ईटी नाऊशी बोलताना ते काही वेळापूर्वी म्हणाले होते, “बुल बाजार हा एक ट्रेनचा प्रवास आहे जो चर्नी रोड स्टेशनवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहोचला आहे. काहीही होऊ शकते पण माझ्या मते निफ्टी 15,000 च्या खाली येण्याची शक्यता फारच कमी आहे.