Raju Srivastav यांनी अर्ध्यात सोडली पत्नीची साथ, जिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फिक्या; पाहा Photo
बॉलीवुड मध्ये कॉमेडियन आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणारे प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची गेले सुमारे ४२ दिवस दिल्लीतील एम्स रुग्णालयात चालत असलेली मृत्यूशी झुंज अखेर त्यांची ही शेवटची लढाई ते हरले… १० ऑगस्ट रोजी त्यांना जबरदस्त हार्ट अटॅक आल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
हार्ट अटॅक आल्यापासून ते कोमामध्येच होते. दरम्यान, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मधल्या काळात त्यांच्या शरीराची हालचाल झाली होती. मात्र ते शुद्धीवर आले नव्हते. मध्यंतरी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण प्रत्येकाच्या आशेवर पाणी फिरले आणि अखेर डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला.गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या कॉमिक टायमिंगने चाहत्यांना अगदी लोटपोट केले आणि यामुळेच त्यांना कॉमेडी किंगचा किताबही मिळाला आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोमध्ये पहिल्यांदाच राजू यांनी टीव्हीवर येऊन लोकांना हसवले. या शोमधील त्यांच्या अजोड अभिनय आणि हास्य कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर केले..या शोमध्ये राजू यांना ‘द किंग ऑफ कॉमेडी’ या पदवीने सन्मानित करण्यात आली होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल साऱ्यांनाच ठाऊक आहे पण आजच्या या लेखात त्यांच्या पत्नीची ओळख करून घेणार आहोत ज्या खुपच सुंदर आहेत.
राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव आहे. राजूची पत्नी शिखा यांची फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत मास्टरी आहे. त्या इतक्या सुंदर आहेत की अनेकांनी त्यांची तुलना चित्रपट अभिनेत्रींसोबतही केली आहे. शिखा आणि राजूचे बाँडिंग खूपच घट्ट आहे. शिखा ही एक सशक्त महिला आहे जिला कुटुंब कसे बांधायचे हे माहित आहे.
आपल्या पतीच्या निधनानंतर त्या पुरत्या कोलमडल्या होत्या.. त्यांना पूर्ण विश्वास होता की राजू नक्की शुद्धीवर येतील पण त्यांचा हा विश्वास खरा ठरू शकला नाही. तरीही स्वतःला सांभाळत, त्या म्हणाल्या, ‘मी सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही, मी आता काय बोलू? त्याने आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे. मी खूप अपेक्षा करत होते की यातून तो बरा व्हावा, त्याने बरे होऊन परत यावे, अशी प्रार्थनाही केली. पण तसे झाले नाही. मी एवढेच म्हणेन की तो एक खरा फायटर होता.”