प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल.. प्रकृती चिंतजनक चाहते पडले काळजीत ..

0

छोट्या पडद्यावर आपल्या अफलातून कॉमेडीने लोकप्रिय झालेले प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे. त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वर्कआउटच्या मध्यंतरी ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्याठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी रात्री ११ च्या सुमारास राजू श्रीवास्तव यांना दक्षिण मुंबईतील एका जिममध्ये वर्कआउटदरम्यान ही घटना घडली. राजू श्रीवास्तव वर्कआउट करत होते. ट्रेड मिलवर चालत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध पडले आणि त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.. त्यांनतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. त्यांनतर त्यांना रुग्णलयातून घरी सोडण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.

डॉक्टर काहवाल यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दीपूने सांगितले की, एम्सचे डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांना शुद्धीवर आलेले नाही आणि आतापर्यंत त्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही, यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या जवळचे. चिंतेत भर घालत आहे.

केवळ राजू श्रीवास्तवच नाही तर त्यांचा लहान भाऊही दिल्ली एम्समध्ये दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वृत्तानुसार, कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा धाकटा भाऊ गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलच्या न्यूरो विभागाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. होय, राजू श्रीवास्तव दुसऱ्या मजल्यावर तर त्याचा भाऊ तिसऱ्या मजल्यावर दाखल आहे.

दरम्यान, सुनील पाल यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून राजूच्या तब्येतीची माहिती दिली आहे. ते म्हणाले होते, “कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला हे खरे आहे. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते पण आता त्यांची प्रकृती चांगली आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आणि देवाच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती ठीक आहे. तो धोक्याबाहेर आहे. राजू भाऊ, लवकर बरे व्हा. आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो आता बरा होत आहे ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आम्ही त्याची मुंबईत वाट पाहत आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप