प्रेग्नेंट आलिया भटचा हा क्युट डान्स पाहिलात का? आपल्या गोड अंदाजाने दिलाय सगळ्यांना सुखद धक्का!

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियातील प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर! दोन महिन्यांपूर्वीच आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरच आलिया आणि रणबीर ने सगळ्यांना गुड न्यूज देखील दिली! आलियाची प्रेग्नेंसीची बातमी जगजाहीर झाल्यापासून ती कायमच चर्चेत असलेली दिसते, तसेच या दोघांच्याही चाहत्यांना या गोड बातमीने सुखद धक्काच बसलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिच्यावर तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छा आणि कौतुकांचा होणारा वर्षाव ही सर्वांना पाहायला मिळाला! अशातच आलियाचा आणखीन एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडिओ फिल्म मेकर करण जोहर याने शेअर केला आहे. नेमक आहे तरी काय या व्हिडिओत? चला या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया.

 

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या नावाचा आलिया भटचा आगामी चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीसाठी येणार आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह झळकताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर करणने आलियाचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. यामध्ये या सिनेमाच्या सेटवर एक छोटस सेलिब्रेशन देखील होत असलेलं पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये आलिया सोबत रणवीर सिंह आणि सिनेमाची इतर टीम देखील पाहायला मिळत आहे. यावेळी या व्हिडिओमध्ये आलियाने रणबीरच्या ‘चन्ना मेरे या’ या गाण्यावर आपल्या गोड अंदाजात डान्स देखील केला! करण मेरी राणी म्हणत यावेळी व्हिडिओ शूट करत होता. व्हिडिओमध्ये असलेला आलियाचा हा सिम्पल लुक आणि गोड अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच भुरळ घालत आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करणने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत असलेल्या बघायला मिळत आहेत. ‘आलिया मम्मी खूप क्युट दिसते’ ‘दिवसेंदिवस आलिया मॅच्युअर होत चालली आहे’ अशा अनेक गोड कमेंट्स या व्हिडिओवर येत असलेल्या पाहायला मिळत आहेत. आलियाचा प्रेग्नेंसी ग्लो दिवसेंदिवस वाढत चालला आहे असा एकंदरीत तिच्या चाहत्यांचा सूर होता.

याच दरम्यान आलियाचा आगामी ‘डार्लिंग’ या सिनेमाचा ट्रेलर देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे देखील ती जोरदार चर्चेत आली आहे. तिचे अनेक आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहेत. याशिवाय तिचं बाळही लवकर येणार आहे. आलियाचे चाहते आता तिचे आगामी चित्रपट आणि येणाऱ्या बाळासाठी खूप उत्सुक असलेले दिसत आहेत.

Leave a Comment

Close Visit uttamsheti