मुळशी पॅटर्न फ्रेम लोकप्रिय अभिनेता- दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडे यांच्या वडिलांचा हा व्हिडिओ पाहिलात का? वयाच्या ७९ व्या वर्षी देखील करत आहेत शेतात काम!

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे!! प्रवीण तरडे आतापर्यंत अनेक सिनेमांमधून झळकले आहेत. अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी मुख्य भूमिका साकारत आपली वेगळीच छाप उमटवली आहे. तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘मुळशी पॅटर्न’ ‘धर्मवीर’ ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारखे चित्रपट देखील चित्रपट रसिकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड हिट देखील झाले आहेत!

 

धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शन देखील प्रवीण तरडे यांनी केलेले आहे. मात्र तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? की अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडे यांचा आपल्या शेतीवर खूप जीव आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झालाय म्हणूनच आज देखील त्यांचे वडील शेतामध्ये कष्ट करताना दिसतात. प्रवीण तरडे यांनी आपल्या वडिलांचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला असल्याचे समजत आहे. तरडे यांचे जेव्हा इंटरव्यू होतात तेव्हा देखील त्यांच्या बोलण्यामधून ते शेतकरी असल्याचा आपल्याला अभिमान आहे हे प्रकर्षाने जाणवतं. यामुळेच प्रवीण स्वतः देखील कामामधून ब्रेक मिळतात शेती करताना दिसतात. त्यांचे वडील विठ्ठल तरडे यांचे वय आज ७९ वर्षे आहे, पण असे असले तरी देखील ते आजही तितक्याच मेहनतीने शेतात काम करताना दिसतात.

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडे यांनी त्यांचा शेतामध्ये राबत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यांचा हा व्हिडिओ सगळ्याच नेटकऱ्यांना आवडला असून, त्यावर त्यांच्या चाहत्यांची विशेष दाद असणाऱ्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत.

तरडे यांनी वडिलांचा व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे की, “आज माझ्या वडिलांचा विठ्ठल रावांचा ७९ वा वाढदिवस. पुढच्या वर्षी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा! पांडुरंगाच्या चरणी एकच इच्छा १०० पर्यंत त्यांना असंच आरोग्य लाभू दे. खूप शुभेच्छा दादा!”

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांचे वडील शेतात काम करत असताना दिसत आहेत. पावसाळ्यात असणाऱ्या शेतीच्या कामांमध्ये ते पूर्णपणे व्यस्त झाले असताना देखील ‘विठूचा गजर हरिनामाचा’ हे गीत त्यात ते गाताना दिसत आहेत. काम करत असताना देखील विठ्ठलाच्या भक्तीत गुंग झाले असल्याचे चित्र यामध्ये पाहायला मिळाले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांच्या वडिलांना अनेक नेटकऱ्यांनी देखील वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Close Visit uttamsheti