“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात..” प्रार्थना बेहेरेची ती पोस्ट होतेय ट्रोल..

0

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून नेहा कामत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. या मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचं खूप सारं प्रेम मिळत असतं. प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट असते.

तस पाहता सेलिब्रेटींना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना ही करावा लागतो. आणि याचा सामना आता प्रार्थनालाही करावा लागतो आहे. प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे ती ट्रोलिंग ला बळी पडत आहे. अनेकदा चाहते अभिनेत्रींना तू आई कधी होणार हा प्रश्न नक्कीच विचारला जातो. यावरच प्रार्थानने तिच्या पोस्टच्या माध्यमातून या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.

दरम्यान, प्रार्थनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर ए रस्त्यावरील एका बोर्डचा फोटो पोस्ट केला आहे.“जेव्हा तुम्हाला वयाच्या तिशीत मुलं नसतात तेव्हा खरं तर तुम्ही २० वर्षांच्या असता. पण त्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात”, असे त्यावर लिहिलेलं आहे. हा फोटो पोस्ट करत तिने हे अगदी खरंय असं म्हटलं आहे.

तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे म्हंटले तर प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर १४नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नबंधनात अडकले. अभिषेक जावकर बाबत सांगायचे तर तो एक मल्टीटास्कर आहे. तो उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे.

जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली. डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. मिसिंग ऑन अ वीकें हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केले.

प्रार्थनानं तिच्या निखळ सौंदर्यानं आणि जबरदस्त अभिनयानं नेहमीच चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. तिने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून ओळख मिळवली. त्यानंतर मितवा या मराठी चित्रपटातून चाहत्यांना भुरळ पाडली.

तिचा चाहतावर्ग बराच मोठा असून तिला पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रतिक्षेत आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेत नेहा आणि अनुष्का ची भूमिका साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.