छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ यामधील नेहाने म्हणजेच प्रार्थना बेहरेने तिच्या अभिनयाने सर्वाच्या मनात आपली जागा निर्माण केली. पण प्रार्थना तिच्या युनिक फॅशनसेन्समुळे देखील ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक खूपच वेगळा आणि ग्लॅमरस असतो. प्रार्थना सोशल मीडियाच्या मध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
आपल्या कामामधून वेळ काढत सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आपल्याला अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेल्या प्रार्थनाचा अनोखा अंदाज पहायला मिळतो आहे.
प्रार्थनाला नुकतीच तिच्या शूटिंगमधून सुट्टी मिळाली होती. त्यामुळे तिच्या घरी संध्याकाळी हातात कॉफीचा मग घेऊन खिडकीतून दिसणारा समुद्र आणि सूर्यास्त पहात फ्रेश मूडमध्ये ती गाणी ऐकत होती. ‘शाम’ हे अत्यंत लोकप्रिय गाणं ऐकता ऐकता तिनेही त्या गाण्यात सूर मिसळले. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं, “सनसेट आणि तू…”
View this post on Instagram
हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी शेअर केला. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडला. या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत त्यांनी तिचं गाणं आवडल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे अनेकांनी “तुझं गाणंही यापुढेही ऐकायला आम्हाला आवडेल” अशाही कमेंट्स केल्या. प्रार्थनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान, मालिकेत दाखवण्यात आली सिंगल मदर असलेली नेहा आणि तिची मुलगी परी यांच्या आयुष्यात येणारा श्रीमंत उद्योजक यशवर्धन ही कथा प्रेक्षकांना भावली. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नेहाचा झालेल्या मृत्यूमुळे मालिकेत बरीच उलथापालथ झाली आहे. नेहाच्या अचानक जाण्याने परी कोलमडून पडली आहे तर यश अजूनही स्वतःला स्वावरू शकला नव्हता. इतक्यातच नेहाची अनुष्का म्हणून मालिकेत रीएन्ट्री झाली. आणि पुन्हा मालिकेच्या कथानकाने वळण घेतलं आहे.
आता अनुष्काला हळू हळू आपण नेहा आहोत याची जाणीव होते आहे तर दुसरीकडे अजूनही सिम्मी यश चे दुसरे लग्न लावण्याच्या तयारीत आहे. अनुष्काचा भाऊ यश चा नेहमी पानउतारा करण्यासाठी तयारच असल्याचे पहायला मिळते.
दरम्यान, परी अनुष्काला भेटल्यानंतर हीच माझी आई आहे आणि यश खोटे बोलतो आहे असे म्हणत तिला मिठी मारून रडायला लागते. पण यश तिला समजावतो. पण आता हे पाहणे गरजेचे आहे की अनुष्का असलेली नेहा परीला ओळखेल का? तिला पुन्हा सर्व आठवेल का? याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.