दगडूच्या आयुष्यात आली का प्राजू? प्रथमेश परबने केले फोटोज् शेयर आणि नेटकऱ्यानी केला कहर..
मराठी सिनेसृष्टीतील तरुणाईला वेड लावणारा चित्रपट म्हणजे ‘टाइमपास’. या चित्रपटाने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला वेडे केले होते. दगडू आणि प्राजू ची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. कोवळ्या वयातील या दोघांची निरागस जोडी चाहत्यांच्या मनात आजही स्थान मिळवून आहे. या चित्रपटामुळे दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब आज घराघरात पोहोचला आहे.
या सिनेमातील त्याचे कितीतरी डायलॉग्ज तरुणांना तोंड पाठ आहेत. त्याच्यासोबतच प्राजूनेही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या जबरदस्त भूमिकेमुळे अधिराज्य गाजवले. पण आता सध्या आपल्या लाडक्या दगडूला त्याची खरी प्राजू मिळाली का? या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
प्रथमेशच्या एका सोशल मीडिया पोस्टवरुन त्याच्या रियल लाईफमधील प्राजूची चर्चा नेतकऱ्यामध्ये रंगली आहे. दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी आपले खास क्षण त्याने फोटोज् मार्फत शेयर केले आहेत. आणि त्याने पोस्ट केलेले हेच फोटोज् चर्चेचं कारण बनत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, प्रथमेशने अभिनेत्री क्षितिजा घोसाळकरसोबत दिवाळी साजरी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघंही पारंपरिक लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोज् वर चाहत्यांनी केवळ लाइक्स आणि कमेंट्स नाही तर प्रश्नांचा ही पाऊस पाडला आहे.
“दादूस आमची वहिनी काय?” असा प्रश्न अनेकांनी प्रथमेशला विचारला आहे.
प्रथमेशने शेअर केलेल्या या फोटोने सर्व चाहत्यांना प्रश्न विचारण्यास भाग पाडले आहे. इतकच नाही तर प्रथमेश आणि क्षितिजा रिलेशनशिपमध्ये असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. पण प्रथमेशने क्षितीजासोबत फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही. या दोघांनी आधीही एकत्र फोटोशूट केलं आहे. पण हे फोटो जरा वेगळे आहेत. शिवाय ‘निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्त्वाचं’, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळेच चर्चांना उधाण आलं आहे. याआधी प्रथमेश व क्षितिजाने मकरसंक्रांतीनिमित्त असंच एक फोटोशूट केलं होतं. पण त्यावेळी दोघांच्या नात्यांची चर्चा नव्हती. पण आता दगडूला प्राजू मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
पण या चर्चांवर प्रथमेश किंवा क्षितिजा दोघांपैकी कोणीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चाहत्यांनी मात्र दोघांना शुभेच्छा द्यायला सुरूवात केली आहे. प्रथमेशने आतापर्यंत अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे.कुटुंबात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रथमेशनं आज उत्तम अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. मराठीसोबतच दृश्यम, खजूर पे अटके आणि अन्य या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.