मालिकेचा शेवटचे शूट म्हणत प्रार्थनाने शेयर केला व्हिडीओ.. चाहते झाले नाराज

सोशल मीडियावर अनेक मालिकांचे प्रोमो प्रसिद्ध होत असतात. आणि या माध्यमातून आपल्या आवडत्या मालिकांचे लेटेस्ट अपडेट चाहत्यांना मिळत असतात. झी मराठी वाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’.. या मालिकेनं अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांना आपलंस करत त्यांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले.

मालिकेत दाखवण्यात आलेली नेहा आणि यशची अनोखी प्रेमकहाणी आणि त्या दोघांना जोडणारी परीची निरागसता प्रेक्षकांना चांगलीच भावली. मालिकेतील प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेची केमिस्ट्री चाहत्यांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली तर परीचा गोंडस अभिनयाने चाहत्यांना खिळवून ठेवण्याचे काम केले. सगळ काही सुरळीत चालू असताना सप्टेंबर महिन्यात ही मालिका अचानक बंद झाली पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू करावी लागली.पण आता पुन्हा एकदा निरोपाची वेळ जवळ आली असल्याचे पाहायला मिळत आहे.

ही बातमी नक्कीच मालिकेच्या चाहत्यांना दुःखी करणारी आहे पण ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.नुकताच मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला. याबाबत अपडेट देत सर्वांच्या लाडक्या नेहाने अर्थात प्रार्थना बेहरेनं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.यामध्ये अभिनेत्रीने शूटिंगचा शेवटचा दिवस असा उल्लेख केला आहे.यामध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर धावत येताना दिसतेय.याआधी मालिकतील बालकलाकार मायरा वायकुळने आपल्या शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं सांगत एक व्हिडीओ शेअर केला होता.

दरम्यान, प्रार्थनाने शेयर केलेल्या  या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. झी मराठी वाले हीच मालिका का बंद करत आहेत, त्यांनी चांगलं कथानक लिहिलं असतं तर मालिका बंद करायची वेळच आली नसती, आम्ही नेहा आणि यश यांना मिस करू, आम्हाला त्यांची खुप आठवण येईल अशा शब्दात नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

दरम्यान, एका मुलाखतीत प्रार्थनाने ही मालिका स्वीकारण्यामागचं कारण स्पष्ट केले होते. ती म्हणली, “गेला गेल्या काही वर्षात खूप मालिकांच्या ऑफर आल्या.परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं.म्हणून मी जाणीवपूर्वक मालिकांना नकार देत गेले..त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेद्वारे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.”तिची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय भरली शिवाय तिला बेस्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड देखील मिळाला आहे. 

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप