लग्नाची पाच वर्षे पूर्ण होताच प्रार्थनाने नवऱ्यासाठी केली खास पोस्ट.. चाहत्यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा..

0

मराठी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरेने तिच्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. प्रार्थनाने अनेक चित्रपट आणि मालिकातून आपलं अभिनय कौशल्य दाखवत चाहत्यांना आपलेसे केलं आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहाची भूमिका उत्कृष्टपणे साकारत आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असते त्यामुळे ती कायमच चर्चेत असते. तिने पोस्ट केलेले फोटोज् आणि व्हिडियो वारंवार चर्चेचा विषय बनत असतात. आणि यामुळेच ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पण यावेळी ती एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

प्रार्थना बेहेरेनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट करताच काही वेळातच तुफान व्हायरल झाली आहे. ही पोस्ट करण्यामागे तसे खास कारण देखील आहे, आणि ते म्हणजे प्रार्थना बेहेरेच्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रार्थना आणि अभिषेकच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने नवऱ्यासोबतच्या काही खास क्षणांचा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

व्हिडीओ शेअर करत प्रार्थनाने कॅपशन दिले की, ‘आनंदी पाच वर्षे’. या व्हिडीओला तिनं ‘ना कोई था ना कोई है’ हे गाणं अॅड केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थना आणि अभिषेकने सोबत घालवलेले काही खास क्षण पहायला मिळत आहे. दोघे एकमेकांची कंपनी किती एन्जॉय करतात हे या व्हिडीओवरुन साफ साफ कळत आहे.

प्रार्थना बेहरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर हे साल २०१७ मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांचे आजवरचे फोटोज् व्हिडिओज पाहून कोणाला पटणार देखील मंक की त्या दोघांचे अरेंच मॅरेज आहे. पण नात खुलवल की नक्की खुलतं हे त्यांची जोडी पाहिली की लक्षात येत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांना ओळखले जाते. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Jawkar (@abhishekjawkar)

प्रार्थना व अभिषेक एकमेकांबरोबर बराच वेळ एकत्र घालवताना दिसतात. प्रार्थनाच शेअर करत असलेल्या अनेक व्हिडीओ व फोटोंमधून ते लक्षात येतं. तिला टॅटू गोंदवून घेण्याची आवड आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण गोंदावून घेतलेला हा तिचा पाचवा टॅटू आहे.

टॅटू गोंदावून घेत असताना मात्र प्रार्थनाची अवस्था बिकट झाली. प्रार्थना व अभिषेकने पायावर टॅटू गोंदावून घेतला. प्रार्थना जेव्हा टॅटू गोंदावून घेत होती तेव्हा ती जोरातच ओरडू लागली. तिला वेदना असह्य झाल्या. यावेळी तिच्या नवऱ्याने तिचा हातही धरला होता.इतकंच नव्हे तर टॅटू आर्टिस्टलाही तिने मध्येच थांबायला सांगितलं. तिचा हा व्हिडीओ पाहून सेलिब्रिटी मंडळींनाही हसू अनावरच झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.