प्राजक्ता माळीचा हा गुण पाहून चाहत्यांना पडली भुरळ, करत आहेत खूपच कौतुक…

0

रान बाजार वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. ती अलीकडेच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच ती तिचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्राजक्ता ही जितकी उत्कृष्ट अभिनेत्री आहे तितकीच उत्तम मुलगी आहे. ती नेहमीच तिच्या कुटुंबाशी जोडलेली दिसते. ती बऱ्याचदा कुटुंबसोबत वेळ घालवताना दिसते. इतकेच काय तर ती तिच्या भाच्यांचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. तिच्या या गोष्टीमुळेच तिचे चाहते तिच्यावर नेहमी खुश असततात. या गोष्टींमुळेच प्राजक्ता चाहत्यांची लाडकी आहे. आणि आता तिने केलेली ही एक गोष्ट तिला आणखीन लोकप्रिय बनवत आहे.

सध्या व्हायार होत असलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, प्राजक्ताने तिच्या घराण्याची जुनी परंपरा पाळली आहे. त्याची माहिती तिने सोशल मीडियावरून प्रेक्षकांना दिली आहे. श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूरला जाऊन महादेवाचं दर्शन घेण्याची तिच्या घराची जुनी परंपरा आहे. हीच परंपरा पाळण्यासाठी काल श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत प्राजक्ताने कुटुंबासहित शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेतलं. तिने सोशल मीडियावर महादेवाचा अभिषेक करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

त्यासोबतच तिने लिहिलेले कॅप्शन आकर्षक आहे, ‘योगी- महादेव…श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूर – महादेवाचं दर्शन ; ही घराची परंपरा. काल सोमवारचा मुहूर्त गाठून साळकाय -म्हाळकाय (आई- मावशी किंवा याज्ञा- शिवा काहीही घ्या) सोबत दर्शन घेतलं… ‘चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत तिला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्री आहेच पण एक उत्कृष्ट नागरिक म्हणून ती वेगवेगळ्या राजकीय विषयांवर भाष्य करताना देखील दिसून येत असते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिने फोनवर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याच्या निर्णयाला पाठींबा दर्शवला होता. तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती आणि तिचे कौतुकही करण्यात आले. आणि आज तिला आपल्या परंपरा पाळताना पाहून चाहते तिच्यावर भलतेच खुश झालेत.

दरम्यान, तिने रानबाजार मध्ये साकारलेली रत्ना प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे तर त्यानंतर आलेल्या ‘वाय’ या सिनेमात देखील प्राजक्तानं महत्वाची भूमिका निभावली होती. तर चंद्रमुखी सिनेमात तिने सवाल जवाब गाण्यात केलेले नृत्य आकर्षक ठरले. प्राजक्ता सध्या छोट्या पडद्यावरील कलर्स वाहिनीवरील हास्यजत्रेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय आगामी काळातही तिचे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. ज्याचे अपडेट्स ती वेळोवेळी आपल्याला देतच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप