हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली प्राजक्ता.. व्हायरल झाले फोटोज्..

छोट्या पडद्यावरील आहे.स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड चर्चेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ती विठुरायाच्या वारीमुळे… सध्या आळंदी आणि पंढरपूर भक्तांनी गजबजून गेलं आहे. कोरोना महामारीनंतर संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात पंढरपूरची वारी होत आहे. आणि आता जिकडे बघावे तिकडे हरिनामाच्या गजरात अनेक वारकरी भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत.

या सोहळ्यात आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा वारीत सहभागी झाली आहे. प्राजक्ताने वारीच्या वाटेवरचा एक सुंदर व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती वारकऱ्यांबरोबर पायी वारी करत हरिभजनात तल्लीन झालेली दिसतेय. तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपारीक भजनांवर ठेकाही धरलेला आहे. ‘दोन वर्षानंतर वारी… आनंदी आनंद…,’असं वारीचा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

पंढरीची वारी सुरू झाल्यापासून रोजचा पायी प्रवास, टाळ-मृदंगांचा अखंड नाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष अन् अभंगाच्या सुरावटीत दंग होणारे मन.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालत असलेले लाखो वारकरी ज्या एका ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत.अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारीला हजेरी लावली आहे देत प्राजक्ताने पालखी सोहळ्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये प्राजक्ताने इरकल साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले आहे.टाळ-मृदुंगाचा निनाद करीत धरलेला नादमय ताल.प्राजक्ताच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्ताचे वारीचे फोटो व व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव केलाय. ‘ही एकच अशी अभिनेत्री आहे, जिचा खरंच अभिमान वाटतो,’ असं एका चाहत्याने लिहिलं आहे. ‘रखुमाई सारख्या दिसता’, असं तिचा फोटो पाहून एका चाहत्याने म्हटलं आहे. ‘मस्तच ताईसाहेब, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे ताई,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय. प्राजक्ता सध्या टेलिव्हिजनवर कुठेही दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय दिसते. नुकतीच प्राजक्तानं इंजिनीअरींगची परीक्षा दिली आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप