प्राजक्ताच्या हॉट लुकवर चाहते झाले घायाळ..
तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोज् ने आग लावत असते. तिने पोस्ट करताच काही मिनिटातच फोटोज् व्हायरल होतात. प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोज नवनवे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि ते फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमात पडले आहेत.
अनेकदा प्राजक्ता सोशल मीडियावरील तिचं फोटोशूट शेअर करत असते.प्राजूने तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. हे फोटोज् पाहून चाहते तिच्यावर भलतेच फिदा झाले आहेत. प्राजक्ताने शेयर केलेल्या या फोटोत तिने काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेस परिधान केला आहे. जवान जानेमन..हसीन दिलरुबा…मिल जो दिल जवाँ…असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेयर केला आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या या ब्लॅक ड्रेसला वनसाईड हॅन्ड देण्यात आला आहे. या सुंदर ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधले तीन फोटो शेअर केले होते. तो बात बन जाए… हां हां बात बन जाए….. असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर एकाहून एक भन्नाट कमेंट तिच्या या फोटोंवर येतात. हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही, एकदम भारी दिसत आहे तु कातील अदा आहे तुझी, सई च मार्केट घालवल, बात बन ही गयी अशा कमेंट्स चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर केल्या आहेत.
View this post on Instagram
प्राजक्ताने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. यावेळी प्राजक्ताने सिम्पल असा मेकअप केला होता. यावेळी ड्रेसला मॅचिंग असे शिमरी आयलायनर तिने लावले होते. यावेळी प्राजक्ताने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. यासुंदर ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. ती या ड्रेसमध्ये तीच्या कॅप्शन प्रमाणेच हसीन दिलरुबा दिसत आहे.
यावेळी चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्राजूने तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. प्राजक्ताने नुकतेच एका आगामी मराठी चित्रपटाचं शूटिंग केले आहे. त्यासाठी ती लंडनला गेली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.