सध्या अभिनय करणाऱ्या प्राजक्ताला व्हायचं नव्हत अभिनेत्री..अभिनया व्यतिरिक्त पुण्यात करत होती हे काम..
मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आजही त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यात टॉपला आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्रजातां माळी ही मराठी इंडस्ट्रीमधील क्रश म्हणून नावारूपाला आली आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने आज सिनेसृष्टीत नाव कमावले आहे. तिच्या भुरळ पाडणाऱ्या सौंदर्या ने तिने चाहत्यांना अगदी वेडे केले आहे. प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी ती जोडलेली असते.
सध्या प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आपल्या बोलण्याच्या अनोख्या अंदाजात ती शोचे सूत्रसंचालन करते आहे जे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. परंतु ती या शो शिवाय अनेक चित्रपट आणि मालिकांमधूनही अनेकदा आपल्या भेटीला आली आहे.तुम्हाला माहित आहे का? आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी प्राजक्ताच शिक्षण किती झालंय? चला तर जाणून घ्या आजच्या लेखात.
प्राजक्ताचे संपूर्ण शिक्षण हे पुण्यामध्ये झाले आहे. तिने पुण्याच्या ललित कला केंद्रातून प्राजक्तानं नृत्याच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हि पदवी प्राप्त केली आहे. तिने आपले संपूर्ण शिक्षण हे नृत्यात केले आहे.तिने हि पदवी मिळवताना संगीत आणि अभिनयाचं शिक्षण पूर्ण संपादन केले. त्याचाच फायदा तिला पुढे अभिनय श्रेत्रातही झाला. दरम्यान, तिने एकदा सांगितले होते की,तिला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते परंतु तिच्या नृत्यकलेमुळे तिला अनेक ऑफर्स मिळत गेल्या. पुढे तिने या देखील कामाला सुरवात केली.
वयाच्या १० वर्षी अभिनेत्री प्राजक्ताने डान्स करण्यास सुरवात केली होती. तिला भरतनाट्यम हा डान्स प्रकार प्रचंड आवडत होता. या प्रकारात मास्टरी तिने पुढे पुण्यातच आपला स्वतःचा डान्स क्लासदेखील चालू केला. प्राजक्ता तिच्या कॉलेज शिक्षणात नाचात टॉपर होती.
पण खरं तर तिला आईने बारावी नंतर सायन्स घ्यायला लावले होते. परंतु प्राजक्ताने आपली आवाड लवकरच ओळखली होती. त्यामुळे तिला हे मान्य नव्हते. तिला आपले शिक्षकानं आर्ट्समधून पूर्ण करायचे होते. यावर तिची आई तिच्यावर खूप चिढली होती.
आईने तिला सांगितले, सायन्स घ्यायचं नाही तर मग पैसे कमवा असं तिनं सांगितलं. डान्स क्लास वगैरे सुरू कर तरच मी तुला आर्ट्स घ्यायला देईन, यावर प्राजक्ताने पुण्यातील एका शाळेत डान्स क्लास घायाळ सुरवात देखील केली. आजही ती नृत्यांगण अकॅडमी फॉर भरतनाट्यम नावानं पुण्यात त्याच जोमाने क्लासेस घेते.तिने तिच्या या मेहनतीच्या जोरावर आज ७ शाखा चालवते.