स्वातंत्र्यदिनी घेतला प्राजक्ताने नवा संकल्प, पोस्ट झाली सोशल मीडियावर व्हायरल
सिनेसृष्टीमध्ये असे कित्येक कलाकार आहेत ज्यांनी केवळ आपल्या अभिनयाने नव्हे तर त्यांच्या चांगल्या वृत्तीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. फक्त मनोरंजन करून नाही तर इतर पद्धतीने समाजाला हातभार लावण्याचा प्रयत्न करणारे कलाकार पाहणे तसे दुर्लभच आहे. असच आपल्या हटके विचारांमुळे, समाजाप्रती असलेल्या जाणीवेमुळे देखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारे कलाकार चाहत्यांच्या मनात घर करतात. याच प्रकारे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी आणि सोबतच समाजकार्याची आवड, आजूबाजूला सुरू असलेल्या परिस्थितीवर तिची ठाम मत यामुळे देखील तिनं प्रेक्षकांच्या मनात अधळ स्थान मिळवले आहे. स्वातंत्र्यांच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षी प्राजक्तानं सर्वांना शुभेच्छा देत तिने एक आगळावेगळा संकल्प केला आहे.
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यलयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाला अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देखील समर्थन दिले आणि आज पासून फोनवर हॅलो न बोलता वंदेमारम् बोलण्याचा महत्वाचा निर्णय तिने घेतला.
View this post on Instagram
सोबतच देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनामित्त भारतात राबवण्यात आलेला घरोघरी तिरंगा या मोहिमेला पाठिंबा देत तिच्या घरी मोठ्या उत्साहाने तिरंगा फडकवला आहे. तिरंग्याकडे पाहत असतानाचा फोटो शेअर करत प्राजक्तानं पोस्ट शेअर केली आहे. तिनं म्हटलंय, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो.
ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं! ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं..! आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद वंदेमातरम् सुरू. “देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती” ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना..!
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्स च जणू पाऊसच केला आहे. सोबतच तिला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या. दरम्यान, प्राजक्ताने तिच्या अभिनयाने ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या रानबाजार या वेब सिरीज मध्ये अफलातून कामगिरी केली आहे. त्यामुळे अलीकडे ती नेहमीच चर्चेत येते. शिवाय तिने चंद्रमुखी सिनेमात सवाल जवाब लावणीत उत्कृष्ट नृत्य करत चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आणि सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्याजत्रा या रियालिटी शोचे ती उत्तमरित्या सूत्रसंचालन करत आहे.