प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर.. गृहप्रवेशाचे फोटोज् झाले व्हायरल..
झी मराठी वाहिनीवरील कमी वेळात गाजलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने अख्ख्या महाराष्ट्राला शंभू राजांची ओळख नव्याने करून दिली. सोबतच या मालिकेत महाराणी येसू बाईंची भूमिका साकारून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने चाहत्यांच्या मनात पक्के स्थान मिळवले आहे. तिचा ओहरा आणि महाराणी येसूबाई निभवण्याची तिची अदा पाहून कित्येक लोक आज तिला महाराणी येसुबाईसाहेब म्हणून मुजरा करतात. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचे ऑनलाईन फॅन फॉलोइंगसुद्धा बरच मोठं आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.
प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि खासगी आयुष्यातही ती चांगलीच प्रगती करत आहे. दरम्यान,तिने एक खुशखबर चाहत्यांसोबत शेयर केली आहे. प्राजक्ताने नुकतंच एक नवीन घर घेतलं आहे. ही बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेश आणि सत्यनारायणाच्या पूजेचा आहे. नुकताच तिने नवीन घरात गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली. या व्हिडीओत प्राजक्ता स्वतः पूजा करताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “नवीन घर… गृहप्रवेश… सत्यनारायण पूजा.”
तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.. नव्या घराच्या पुजेसाठी प्राजक्ता स्वतः बसली आहे. तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये ती बाळकृष्णाची पूजा करताना आणि शंख वाजवताना दिसतेय.मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत.
हा व्हिडिओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिने फार कमी वयात हे सगळं सध्या करून दाखवल्याने नेटकरी तिच्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. प्राजक्ता अभिनयासोबतच तिचं शिक्षणही त्याच कसोशीने पूर्ण करत आहे. त्यामुळे तिची जिद्द आणि मेहनत पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. प्राजक्ताने झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने सायलीची भूमिका साकारली होती. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेदरम्यान तिच्यात आणि निर्मात्यांमध्ये वाद झालेले पाहायला मिळाले होते. त्यावेळी हे प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. सध्या प्राजक्ता कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे.