महाराष्ट्राची लाडकी आणि अनेकांना आपल्या अदाकारीने घायाळ करणारी चुल बुली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी.. चाहत्यांची आवडती प्राजक्ता सध्या लंडनमध्ये तिच्या नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील छोटे मोठे क्षण शेअर करते असते. तिच्या पोस्ट कडे जणू चाहते डोळे लावूनच असतात. कधी तिची देशभक्ती दाखवणारी पोस्ट त्यांचे लक्ष वेधून घेते तर तिच्या क्यूट भाचा भाचीचे फोटोज् पाहून चाहते मंत्रमुग्ध होतात. आणि आता नुकतीच तिने केलेली पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात पुढे आहे…
प्राजक्ता लंडन मध्ये खूपच एन्जॉय करत आहे आणि अशातच तिने केलेली पोस्ट यामुळे चाहते नक्की काय झाले आहे हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. तर झालं असं आहे की,
प्राजक्तानं थेट लंडनमध्ये तिच्या खऱ्या प्रेमाची कबुली देत पोस्ट शेयर केली आहे. दरम्यान प्राजक्ताने लंडन मध्ये इंडीयन लूक मध्ये फोटोशूट केलं आहे. आणि हेच फोटोज् शेअर करत तिने कॅप्शन लिहीत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
प्राजक्तानं म्हणते आहे, ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है. या ओळी वाचून प्राजक्ता प्रेमात पडल्याचं वाटत आहे.पण प्राजक्तानं कुण्या व्यक्तीच्या नाही तर भारत देशाच्या प्रेमात आहे. पोस्टच्या शेवटी तळटीप लिहित प्राजक्तानं म्हटलंय, ‘गैरसमज नसावा, प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय’.मध्यंतरी तिच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.प्राजक्तानं मात्र आजवर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा खुलासा केलेला नाही.
तिची पोस्ट पाहून नक्कीच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उठले असणार पण खरे काय नि खरच प्राजक्ता कोणाच्या प्रेमात आहे का? अशा चर्चा साहजिकपणे रंगत आहेत. पण अद्याप त्याचे नाव गुलदस्त्यात आहे. किंबहुना तो आहे की नाही? हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे. पण यावर नक्कीच अपडेट आम्ही तुम्हाला कळवू..
सध्या तिने शुटींगदरम्यान प्राजक्तानं लंडनमधील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली.सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्तानं आजवर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. ती आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे तिथे धमाल मस्ती करत आहेत. हे त्यांच्या पोस्ट वरून सहज दिसून येत आहे. त्यामुळे तिचे चाहते ही खुश आहेत.