स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्रीला झाली अपघातामुळे दुखापत, चाहते पडले काळजीत .

0

छोटया पडद्यावरील अनेक मालिका लोकप्रिय होतात. त्यामधील बरीच पात्रे प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनून जातात. आणि ते कलाकार चाहत्यांचे लोकप्रिय बनतात. म्हणूनच त्यांच्या रोजच्या आयुष्यात काहीही घडो त्याचा अप्रत्यक्ष परिणाम प्रेक्षकांवरही होत असतो. सध्या प्रेक्षकांच्या एका लाडक्या अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या…

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतील मोक्षदा मोहिते ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली आहे. मोक्षदा कणखर आणि आत्मविश्वस्त महिला पोलिस आहे. ही दमदार भूमिका अभिनेत्री शुभांगी सदावर्ते साकारत आहे. ही मालिका मुख्यतः पोलीस अधिकाऱ्यांवर आधारित आहे.त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. नुकताच शुभांगी सदावर्ते या अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. याची माहिती तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. त्यामुळे तिचे चाहते काळजीत पडले आहेत.

“मला आज एका बाईक चालकाने धडक मारली आणि मला हळद लागली”, असे कॅपशन देत शुभांगी ने पोस्ट शेयर केली. या फोटोत दिसत आहे की तिच्या हातावर चांगलीच सूज चढली आहे. त्यामुळे सध्या ती आराम करते आहे. तिने शेयर केलेल्या या पोस्ट वर चाहत्यांनी तिच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे. आणि तिला आराम करण्यासाठी अनेक मेसेजेस केले आहेत.

दरम्यान, शुभांगी स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष्य मध्ये उत्कृष्ट काम करते आहे. तर तिने प्राजक्त देशमुख दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ नाटकात आवलीची भूमिका साकारली आहे. या नाटकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आनंद ओक यांनी या नाटकाला संगीत दिले असून त्यांनाही अनेक बक्षिसे मिळाली आहेत.तिने सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सावित्रीज्योती’ मालिकेत चिमणामाई यांची व्यक्तिरेखा उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

दरम्यान, आपल्या या मोक्षदा या व्यतिरेखे बद्दल एका मुलाखतीत तिने सांगितले, ‘मोक्षदा मोहिते असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. ती प्रत्येक प्रसंगांचा, घटनेचा आणि गुन्ह्यांचा सगळ्या बाजूने विचार करते आणि मगच तिचं मत मांडते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये तिची दहशत आहे. खऱ्या आयुष्यातही जर अन्यायाचा प्रसंग माझ्यासमोर उभा ठाकला तर माझ्यातली मोक्षदा जागी होते.’

अशी धडाडीच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीला झालेल्या दुखापती मुळे तिचे चाहते अस्वस्थ आहेत. पण ती लवकरच बरी होवो हीच सर्वजण अपेक्षा करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप